Free Vaccine For Everyone In 24 Days The Figure Reached 30 To 40 Crores, Minister Mandaviya Tweeted

Free Vaccine For Everyone : 24 दिवसांत लसीकरणाचा आकडा 30 वरून 40 कोटींवर, आरोग्यमंत्री मंडाविया यांचे ट्विट

Free Vaccine For Everyone : केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी सोमवारी म्हटले की, 10 कोटी लोकांना कोविड19 ची लस उपलब्ध करून देण्यासाठी 85 दिवस लागले, तर सर्वांना विनामूल्य लस अभियानामुळे 30 कोटींहून 40 कोटींपर्यंत जाण्यासाठी भारताला फक्त 24 दिवस लागले. Free Vaccine For Everyone In 24 Days The Figure Reached 30 To 40 Crores, Minister Mandaviya Tweeted


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी सोमवारी म्हटले की, 10 कोटी लोकांना कोविड19 ची लस उपलब्ध करून देण्यासाठी 85 दिवस लागले, तर सर्वांना विनामूल्य लस अभियानामुळे 30 कोटींहून 40 कोटींपर्यंत जाण्यासाठी भारताला फक्त 24 दिवस लागले.

सार्वत्रिक लसीकरणाचा नवीन टप्पा 21 जूनपासून सुरू झाला. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, लसींची उपलब्धता वाढविण्यात आली आहे आणि या लसींचा पुरवठा वेळेत करण्यात आला, जेणेकरून राज्य व केंद्रशासित प्रदेश चांगल्या पद्धतीने अभियान राबवू शकतील. यामुळे लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्यात मदत झाली. नव्या टप्प्याअंतर्गत केंद्र सरकार देशात उत्पादित लसीपैकी 75 टक्के लस खरेदी करत असून ती राज्य व केंद्रशासित प्रदेशांना विनामूल्य दिली जात आहे.

आतापर्यंत 40.64 कोटी डोस देण्यात आले

सोमवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाच्या अद्ययावत आकडेवारीनुसार, भारतातील 40.64 कोटींहून अधिक लोकांना कोरोनाविरोधी लस मिळाली आहे. यावर मंडाविया यांनी ट्वीट केले की, ‘जगातील सर्वात मोठी आणि जलद लसीकरण मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सतत नवीन टप्पे गाठत आहे. सुरुवातीच्या काळात 10 कोटी लोकांना लस देण्यासाठी 85 दिवस लागले. आता ‘सबको टीका, नि:शुल्क टीका’ मोहिमेमुळे भारताला 30 कोटीहून ते 40 कोटींचा आकडा गाठण्यासाठी अवघ्या 24 दिवसांचा कालावधी लागला.

सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार मंत्रालयाने सांगितले की, 50,69,232 सत्रांमध्ये लसीचे 40,64,81,493 डोस देण्यात आले आहेत. यापैकी मागील 24 तासांत 13,63,123 डोस देण्यात आले. संसर्ग झालेल्यांपैकी एकूण 3,03,08,456 लोक बरे झाले आहेत, त्यापैकी गेल्या 24 तासांत 38,660 जण बरे झाले. संसर्ग झाल्यानंतर बरे होण्याचा दर 97.32 टक्के आहे.

Free Vaccine For Everyone In 24 Days The Figure Reached 30 To 40 Crores, Minister Mandaviya Tweeted

महत्त्वाच्या बातम्या