अबब! राजस्थानात दारूच्या दुकानासाठी 999 कोटींची बोली, कॉम्प्युटरची क्षमता संपल्याने लिलाव थांबला


दारू दुकान चालविण्यात प्रचंड फायदा असतो मान्य. परंतु, दारुच्या दुकानासाठी चक्क ९९९ कोटी रुपयांची बोली लागण्याचा प्रकार  दौसा जिल्ह्यातल्या साहपूर पाखर गावात घडला.  या दुकानासाठी 999 कोटी 95 हजार 216 रुपयांची बोली लावण्यात आली. Bid for Rs 999 crore for liquor shop in Rajasthan, auction halted due to lack of computer capacity


विशेष प्रतिनिधी

जयपूर : दारू दुकान चालविण्यात प्रचंड फायदा असतो मान्य. परंतु, दारुच्या दुकानासाठी चक्क ९९९ कोटी रुपयांची बोली लागण्याचा प्रकार  दौसा जिल्ह्यातल्या साहपूर पाखर गावात घडला.  या दुकानासाठी 999 कोटी 95 हजार 216 रुपयांची बोली लावण्यात आली.

करण सिंह गुर्जर नावाच्या व्यक्तीने ही बोली लावली आहे. याच दुकानासाठी नवलकिशोर मीणा नावाच्या व्यक्तीने 999 कोटी 90 हजार 216 रुपयांची बोली लावली होती. मीणा हे या लिलावामध्ये दुसºया क्रमांकावर होते. गुर्जर आणि मीणा यापुढेही बोली लावण्यासाठी तयार होते मात्र 1 हजार कोटींच्या पुढची रक्कम स्वीकारण्यासाठी कॉम्प्युटरच्या सॉफ्टवेअरमध्ये सुविधा नसल्याने लिलाव बंद झाला.

उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी अनिल जैन यांनी या लिलावाबाबत बोलताना सांगितलं की करण गुर्जर यांना हे दुकान चालवण्यासाठी दिलं जाण्याला प्राधान्य मिळेल कारण त्यांनी सर्वाधिक बोली लावली आहे. ते असमर्थ ठरल्यास नवल मीणा यांना ही संधी दिली जाईल. जर दोघेही ा पैसे भरून दुकान चालवायला घेण्यास असमर्थ ठरले तर दोघांना 3 वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट करण्यात येईल असे जैन यांनी सांगितले.या लिलावात भाग घेण्यासाठी 2 लाख 60 हजार रुपयांची अनामत रक्कम भरावी लागते. गुर्जर आणि मीणा हे ब्लॅकलिस्ट झाल्यास त्यांची अनामत रक्कम जप्त करण्यात येईल असेही जैन यांनी सांगितले. या दुकानासाठी बेस प्राईझ म्हणजेच मूळ किंमत ही 1 कोटी 84 लाख 65 हजार ठेवली होती. यापुढे बोलीला सुरुवात झाली, जी 999 कोटींपर्यंत पोहोचली आहे.

राजस्थानात दारू विक्रीचे दुकान मिळवण्यासाठी बेफाम पैसा खर्च केला जात आहे. जवळपास 6 महिन्यांपूर्वी हनुमानगड भागातील दारूविक्रीचे दुकान मिळवण्यासाठी 510 कोटींची बोली लावण्यात आली होती.  या दुकानाचा सरकारतर्फे लिलाव करण्यात आला होता. या दुकानासाठी प्रियांका आणि किरण कंवर या दोन महिलांनी 510 कोटींची बोली लावली होती. हा लिलाव या दोघींनी जिंकला खरा, मात्र पैसे न भरल्याने या दोघींना लिलाव प्रक्रियेच्या ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आलं आहे.

Bid for Rs 999 crore for liquor shop in Rajasthan, auction halted due to lack of computer capacity


विशेष बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण