राजस्थानात हेल्मेट मोफत , दुचाकी खरेदीवेळी ग्राहकांना द्या ; वाहतूक मंत्र्यांनी दिले आदेश


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दुचाकीचालकांना आता हेल्मेट खरेदी करण्याची गरज नाही. हेल्मेट घालणं अनिवार्य आहे, तर खरेदी करण्याची गरज कशी लागणार नाही? असा प्रश्न पडू शकतो.Helmet free in Rajasthan, give to customers when buying a bike; Orders issued by the Minister of Transport

मात्र राजस्थानचे वाहतूक मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी, दुचाकीच्या विक्रीवेळी आता विक्रेत्याला वाहनासोबत हेल्मेटही द्यावं लागेल, असे निर्देश दिले आहेत. चालकांची सुरक्षितता लक्षात घेता,गाडीसोबत फ्री हेल्मेट देण्यासाठी सांगण्यात आल्याचं, खाचरियावास यांनी सांगितलं. रस्ते अपघातातील जखमी आणि मृत्यूमुखी होण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी हे पाऊल उचललं आहे.

अनेक जण पैशांच्या कमतरतेमुळे साधारण हेल्मेट घेतात, जे अपघातावेळी फायद्याचं ठरतच असं नाही. सरकारकडून आता ISI मार्क असणारे मजबूत हेल्मेट उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

Helmet free in Rajasthan, give to customers when buying a bike; Orders issued by the Minister of Transport

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण