आत्मनिर्भर भारत योजनेचे बांगला देशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्याकडून कौतुक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून केंद्र सरकारने सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत योजनेचे बांगला देशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी कौतुक केले आहे. भारतात कोविड-१९ या साथीच्या रोगाविरुद्ध दिलेला लढा आणि कोरोनाच्या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी आत्मनिर्भर भारत योजनेखाली जाहीर करण्यात आलेले आर्थिक पॅकेजबद्दल शेख हसिना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी (दि. 17) प्रशंसा केली.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून केंद्र सरकारने सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत योजनेचे बांगला देशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी कौतुक केले आहे. भारतात कोविड-१९ या साथीच्या रोगाविरुद्ध दिलेला लढा आणि कोरोनाच्या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी आत्मनिर्भर भारत योजनेखाली जाहीर करण्यात आलेले आर्थिक पॅकेज याबद्दल शेख हसिना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी (दि. 17) प्रशंसा केली.

Bangladesh PM Sheikh Hasina lauds Atmanirbhar Bharat Yojana

मोदी आणि हसिना हे भारत-बांगलादेश शिखर परिषदेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. यावेळी बोलताना शेख हसिना म्हणाल्या की, मोदी यांनी मे महिन्यात देशाला संबोधित करताना चीनी व्हायरसवर मात करण्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते.

मोदी सरकारने ज्या पद्धतीने महामारीचा प्रतिकार केला ते उल्लेखनीय आहे, असे हसिना म्हणाल्या,आरोग्यसेवा पॅकेजसह आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत जे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले ते कौतुकास्पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या धोरणांची अंमलबजावणी केली आहे त्यामुळे भारत जागतिक अर्थव्यवस्थेत अधिक महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वासही हसिना यांनी या वेळी व्यक्त केला.

कोरोनामुळे झालेले आर्थिक आणि सामाजिक परिणाम दूर करण्यासाठी आपल्या सरकारनेही १४.१४ अब्ज डॉलरचे पॅकेज जाहीर केले आहे, असेही हसिना म्हणाल्या. भारत हा बांगलादेशचा सच्चा मित्र आहे, असे सांगून शेख हसिना यांनी १९७१ च्या युद्धात भारताने जे सहकार्य केले त्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली. बांगलादेशला ज्या महिन्यात विजय मिळाला त्याच महिन्यात मोदी यांची भेट होत असल्याबद्दलही हसिना यांनी आनंद व्यक्त केला.

Bangladesh PM Sheikh Hasina lauds Atmanirbhar Bharat Yojana

यावेळी बोलताना मोदी म्हणाले की बांगलादेशच्या पंतप्रधानांनी कोरोनाविरूद्ध लढ्यात मोठे धैर्य दाखवले आहे. कोरोना काळात, दोन्ही देशांमध्ये आरोग्य सेवांबद्दल चांगले सहकार्य होते आणि भारत बांगलादेशला सर्वतोपरी मदत करेल. बांगलादेश हा आमच्या ‘नेबर फर्स्ट’ पॉलिसीचा एक महत्त्वाचा भाग आहे. मोदी म्हणाले की, महात्मा गांधी आणि शेख मुजीबुर रहमान यांच्या डिजिटल प्रदर्शनाचे उद्घाटन माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. दोन्ही देशांमधील तरुण या महान व्यक्तिमत्त्वांकडून प्रेरणा घेत राहतील.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात