कृषि मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे पत्र जरूर वाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शेतकऱ्यांना आवाहन


केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंंह तोमर यांनी लिहिलेले पत्र सर्व शेतकऱ्यांनी जरूर वाचावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. कृषिमंत्र्यांनी नम्रपणे संवाद करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे अन्नदात्या शेतकऱ्याला माझा आग्रह आहे की हे पत्र जरूर वाचा, असे त्यांनी म्हटले आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्रसिंंह तोमर यांनी लिहिलेले पत्र सर्व शेतकऱ्यांनी जरूर वाचावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. कृषि मंत्र्यांनी नम्रपणे संवाद करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे अन्नदात्या शेतकऱ्याला माझा आग्रह आहे की हे पत्र जरूर वाचा, असे त्यांनी म्हटले आहे.

read the letter of Agriculture Minister Narendra Singh Tomar Modi’s appeal to farmers

गेल्या २२ दिवसांत दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना ट्विटरवरून आवाहन केले आहे. त्यांनी कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचे पत्र वाचण्याचे आवाहन केले आहे. तोमर यांनी शेतकऱ्यांच्या नावाने खुले पत्र लिहिले आहे.

यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, सर्व शेतकरी बंधु-भगिनींना मी आग्रह करतो की सर्वांनी हे पत्र वाचावे. गेल्या सहा वर्षांत कोणताही दुजाभाव न करता सबका साथ सबका विकास सबका विश्वास या मंत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखशली सरकारचे काम सुरू आहे. प्रत्येकाचे हित साधण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या सहा वर्षांतील इतिहास त्याचा साक्षीदार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी राजकीय पक्ष आणि तथाकथित बुध्दीवाद्यांच्या भडकावण्यापासून दूर राहावे. कारण त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना सुविधांपासून वंचित ठेवले आहे. खोटेपणा करून अनेक षडयंत्रे रचली जात आहेत. शेतकऱ्यांना भडकाविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

read the letter of Agriculture Minister Narendra Singh Tomar Modi’s appeal to farmers

ते म्हणतात की, चीनी व्हायरस महामारीचय काळात अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची होती. सरकारनेही विक्रमी खरेदी करून त्यांना बळ दिले. मात्र,तरीही विरोधी पक्ष खोटे बोलत आहे. शेतकऱ्यांनी एक लाख कोटी रुपये निधी देऊन पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. नव्या कृषि कायद्यांमुळे शेतकऱ्यांना सर्व बंधनातून मुक्त केले आहे. आपल्याला पाहिजे तेथे शेतकरी आपले उत्पादन विकू शकेल.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात