आर्याने मोडला देवेंद्र फडणवीस यांचा विक्रम, बनली देशातील सर्वात तरुण महापौर


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे काही वर्षांपूर्वीपर्यंत देशातला सर्वांत तरुण महापौर असा विक्रम होता. मात्र, केरळमधील आर्या राजेंद्रन या २१ वर्षांच्या तरुणीने हा विक्रम मोडला आहे.

 वृत्तसंस्था

तिरुवनंतपुरम : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे काही वर्षांपूर्वीपर्यंत देशातला सर्वांत तरुण महापौर असा विक्रम होता. मात्र, केरळमधील आर्या राजेंद्रन या २१ वर्षांच्या तरुणीने हा विक्रम मोडला आहे. Arya broke Devendra Fadnavis’ record

केरळची राजधानी तिरुवनंतपुरम या शहराच्या महापालिकेच्या महापौर म्हणून आर्या राजेंद्रन यांची निवड झाली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्य असलेल्या आर्या राजेंद्रन देशातल्या आतापर्यंतच्या सर्वात तरुण महापौर ठरल्या आहेत.

आर्या राजेंद्रन यांचं तिरुवनंतपुरमच्या एलबीएस कॉलेजमध्ये शिक्षण सुरू आहे. त्या तिथून बीएससी पदवीसाठी अभ्यास करत आहेत. पण ग्रॅज्युएट व्हायच्या आधीच त्या शहराच्या महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. आर्या गणिताच्या विद्यार्थिनी आहेत.

स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेत आर्या कार्यरत होत्या. आर्या यांनी महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच लढवली. माकपच्या जिल्हा सचिवालयानेच त्यांच्या उमेदवारीची शिफारस केली होती. थिरुवनंतपुरमच्या मुदवनमुगल वॉडार्तून त्या निवडून आल्या. एवढ्या लहान वयात नगरसेवक होण्याची संधी त्यांना मिळाली. पण त्याहून मोठा मान त्यांना शुक्रवारी मिळाला, जेव्हा त्यांची महापौरपदासाठी निवड झाली.

Arya broke Devendra Fadnavis’ record

महाराष्ट्रात हा मान देवेंद्र फडणवीस यांना 1997 साली मिळाला होता. नागपूर महापालिकेचे सर्वांत तरुण महापौर म्हणून त्यांची निवड झाली होती. त्या वेळी फडणवीस यांचं वय 27 वर्षं होतं. त्याअगोदर आर्या राजेंद्रन यांच्याप्रमाणेच वयाच्या 21 व्या वर्षी ते नागपूर महापालिकेची निवडणूक जिंकून नगरसेवक झाले होते.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण