परकीय गंगाजळीत लक्षणीय वाढ,रिझर्व्ह बॅंकेचा अहवाल


देशाच्या परकीय चलन गंगाजळीत लक्षणीय वाढ झाली आहे. परकीय चलनाच्या राखीव साठा २.५६३ अब्ज डॉलर्सने वाढून ५८१.१३१ अब्ज अमेरिकी डॉलरची झाला आहे. भारताकडील चलन साठ्यात आतापर्यंतचा परकीय चलन गंगाजळीचा उच्चांक आहे. Significant increase in foreign exchange reserves, report by the Reserve Bank

विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशाच्या परकीय चलन गंगाजळीत लक्षणीय वाढ झाली आहे. परकीय चलनाच्या राखीव साठा २.५६३ अब्ज डॉलर्सने वाढून ५८१.१३१ अब्ज अमेरिकी डॉलरचा झाला आहे. भारताकडील चलन साठ्यात आतापर्यंतचा परकीय चलन गंगाजळीचा उच्चांक आहे. रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार, १८ डिसेंबरला संपलेल्या आठवड्यात परकीय गंगाजळीत मोठी वाढ झाली आहे.

गेल्या आठवड्यात त्यामध्ये ७७६ दशलक्ष घट झाली होती. मात्र, या आठवड्यात चांगली कामगिरी केली आहे. परकीय चलनाच्या मालमत्तेत वाढ झाल्याने हा साठा वाढला आहे. सध्या परकीय चलन मालमत्तेत १,३८२ अब्ज डॉलर्सवरून ५३७.७२७ अब्ज डॉलर वाढ दिसत आहे. Significant increase in foreign exchange reserves, report by the Reserve Bank

चीनी व्हायरसची साथ असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत योजना सुरू केली आहे. त्याचबरोबर चीनकडून होत असलेल्या आयातीवर निर्बंध आणण्यात आले आहेत. त्यामुळे देशी उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्याकडून होणाऱ्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे.

Significant increase in foreign exchange reserves, report by the Reserve Bank

त्याचबरोबर चीनी व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर भारत मास्क,सॅनिटायझर, पीपीई किट आणि इतर औधांचा मोठा निर्यातदार बनला आहे. त्यामुळे परकीय गंगाजळी वाढत आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात