नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास झाला सुरु ; दोन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता


वृत्तसंस्था

पुणे : अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांमुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाची शक्यता आहे, मात्र त्यानंतर पाऊस विश्रांती घेणार आहे. नैर्ऋत्य मोसमी वारे राज्यातून परतण्यासाठी अनुकूल स्थिती असून बहुतांश भागातून मोसमी वारे माघारी परततील, असे हवामान विभागाने स्पष्ट केले. Arabian sea in konkan and central maharashtra chance of thunderstorms

अरबी समुद्रातील वाऱ्यांमुळे राज्याच्या काही भागांत विजांच्या कडकडाटात वादळी पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी विजाही कोसळल्या आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात दोन दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. त्यामुळे दोन दिवसांनंतर पाऊस विश्रांती घेणार आहे.

आज-उद्या पाऊस पडणार

कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, नगर, सोलापूर आदी जिल्ह्यांत ११ ऑक्टोबरपर्यंत, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांत ११ आणि १२ ऑक्टोबरला पावसाची शक्यता आहे.

Arabian sea in konkan and central maharashtra chance of thunderstorms

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था