पोलिस अधिकारी राजू भुजबळ , संजय पाटील यांच्या घरांवर छापे; अनिल देशमुख यांच्या अडचणी अधिकच वाढल्या


वृत्तसंस्था

मुंबई : सीबीआयने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी एकूण १२ छापे आज टाकले आहेत. यात मुंबई पोलिस दलातील दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या घरांचा समावेश आहे. त्यात पोलिस उपायुक्त राजू भुजबळ यांच्या अहमदनगरमधील घरावर आणि  सहाय्यक पोलिस आयुक्त संजय पाटील यांच्या पुणे येथील घरावर छापा टाकला आहे. यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. Anil Deshmukh’s troubles escalated, with raids on police officers’ homes

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी सचिन वाझे याला दरमहा १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. त्यानंतर याप्रकरणी कोर्टाच्या आदेशाने सीबीआय आणि ईडी यांच्याकडून चौकशी सुरू झाली.आज सीबीआयने मोठी कारवाई करत मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि अहमदनगर या शहरांतील १२ ठिकाणी छापे टाकले असून त्यात संजय पाटील, राजू भुजबळ या दोन बड्या पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. संबंधित ठिकाणांचीही झाडाझडती घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.  काही कागदपत्रेही जप्त केल्याचे समजते.

अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करत असताना ईडीच्या हाती काही कॉल डीटेल्स आणि चॅट डाटा सापडला आहे. त्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई पोलिस दलात उपायुक्त पदावर कार्यरत असलेल्या राजू भुजबळ यांचे घर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आहे. ईडीच्या (अंमलबजावणी संचालनालय) पथक दोन वाहनांतून दाखल झाले असून  त्यांनी भुजबळ यांच्या कुटुंबीयांचे जबाब घेतले तसेच कागदपत्रेही तपासल्याची माहिती मिळत आहे.

Anil Deshmukh’s troubles escalated, with raids on police officers’ homes

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण