महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना शेजारील राज्यांची संख्या मात्र वाढत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने बाहेरील राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांकडे निगेटिव्ह कोरोना रिपोर्ट असेल तरच राज्यात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. Admission to Maharashtra only if Corona report is negative, decision of state government
प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना शेजारील राज्यांची संख्या मात्र वाढत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने बाहेरील राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांकडे निगेटिव्ह कोरोना रिपोर्ट असेल तरच राज्यात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्ये सरकारने लॉकडाउन १ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वीचे निर्बंध कायम ठेवले आहेत. मात्रए यावेळी ठाकरे सरकारने परराज्यातून प्रवास करणाºयांसाठी निगेटिव्ह आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट बंधनकारक केला आहे. त्याशिवाय बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करता येणार नाही. हा रिपोर्ट ४८ तास आधी काढलेला असणे गरजेचे आहे.
याशिवाय कार्गो कॅरिअरमध्ये चालक आणि क्लिनर अशी दोघांनाच परवानगी असणार आहे. जर हे कार्गो कॅरिअर परराज्यातून प्रवेश करत असतील तर निगेटिव्ह आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट बंधनकारक असून ४८ तासांच्या आत तो काढलेला असावा. स्थानिक बाजारपेठा तसेच एपीएमसीवर पालिकांनी लक्ष ठेवून करोनाच्या नियमांचे पालन होत आहे की नाही याची खबरदारी घेण्याची जबाबदारी असेल. जर एखाद्या ठिकाणी पालन होत नसेल किंवा परिती हाताळणं शक्य होत नसेल तर स्थानिक प्रशासन तिथे निर्बंध वाढवण्याचा किंवा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतं.
औषधे आणि कोरोनाशी संबंधित सामग्रीसाठी प्रवास करावा लागणाºया विमानतळ आणि बंदरावरील कर्मचाऱ्याना लोकल, मोनो आणि मेट्रोने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. एखाद्या ठिकाणी निर्बंध वाढवायचे असल्यास स्थानिक प्रशासनाकडे हक्क देण्यात आले असून यासाठी निर्बंध लागू करण्याच्या ४८ तास आधी नोटीस द्यावी असे सागंण्यात आलं आहे. हे सर्व निर्बंध १ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत.
राज्यातील करोनाचा उद्रेक रोखण्यासाठी राज्यात १४ एप्रिलपासून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आधी हे निर्बंध १ मेपर्यंत होते व नंतर १५ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत शनिवारी संपत असल्याने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. या निबंर्धामुळे राज्यात करोनाची साथ नियंत्रणात आली असून राज्याचा रुग्णवाढीचा दर कमी झाला आहे. १० ते १५ जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा कमी झाला असला तरी अजूनही काही जिल्हयात बाधितांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सध्याचे निर्बध आणखी १५ दिवस वाढविण्याची मागणी बहुतांश मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. त्यानुसार लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App