विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – बिर्ला उद्योगसमूहाने मागील २५ वर्षाच्या काळामध्ये अन्य देशांतील ४० पेक्षाही अधिक कंपन्या आणि उद्योग समूह खरेदी केले असून याच उद्योगसमूहाने आता स्थानिक पातळीवर अधिक मजबुतीने उभे राहण्याचे ठरविले आहे. Aditya Birla Group changing their policies
आदित्य बिर्ला ग्रुपचे सर्वेसर्वा कुमारमंगलम बिर्ला यांनी उद्योग धोरणात आमूलाग्र बदलांचे सूतोवाच केले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कोणतीही बडी कंपनी अथवा उद्योग समूह घेण्याची आपली इच्छा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या साथीमुळे उत्पादित मालाप्रमाणेच मानवी वाहतुकीवर देखील मोठ्या प्रमाणावर मर्यादा आल्या असून पुरवठा साखळीवर देखील त्याचा परिणाम होताना दिसून येतो.
ते म्हणाले, ‘‘ मागील काही वर्षांमध्ये चीनचा वेगाने झालेला आर्थिक विकास आणि कोरोनाच्या उद्रेकामुळे जागतिक पुरवठा साखळीमधील कमकुवत दुवे उघड झाले आहेत. आता प्रत्येक देशाला वेगळा विचार करणे भाग पडले आहे. मग तो अमेरिका असो किंवा युरोपीय महासंघ किंवा ऑस्ट्रेलिया. प्रत्येकजण स्थानिक उद्योगांचे संरक्षण करत आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करतो आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App