A Legendary Himveer : 17500 फूट- उने 30 डिग्री तापमान – वय 55 – ITBP Commandantचे न थकता पुश अप्स… व्हिडीओ तुफान व्हायरल…


ITBP कमांडंट रतनलाल यांचा तरुणांनाही लाजवेल असा व्हिडिओ व्हायरल होत आहे.


55 वर्षीय कमांडंट रतन लाल सिंग सोनल यांनी लडाखमध्ये 17,500 उंचीवर उणे 30 अंश तापमानात 65 पुशअप्स केले आहेत.


विशेष प्रतिनिधी

श्रीनगर : भारतीय सैन्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात .देशप्रेमाने ओतप्रोत असणारे भारतीय सैनिक सदैव भारतमातेच्या रक्षणासाठी तत्पर असतात .त्यासाठी त्यांना शारीरिक दृष्ट्या कणखर राहावे लागते .याचेच एक उदाहरण म्हणजे हा व्हिडीओ.सध्या एका ITBP जवानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये 55 वर्षीय कमांडंट रतन लाल सिंग सोनल यांनी लडाखमध्ये 17,500 उंचीवर उणे 30 अंश तापमानात 65 पुशअप्स करून लोकांना आश्चर्यचकित केले आहे.A legendary Himveer : 7,500 feet at minus 30 degree Celsius’: 55-year-old ITBP personnel completes over 60 push-ups in Ladakh

 

 

अत्यंत कठीण परिस्थितीतही भारतमातेच्या या शूर सुपुत्रांना त्यांच्या कर्तव्यापासून रोखता येत नाही, याचा हा व्हिडिओ पुरावा आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये, ITBP कमांडंट रतन लाल सिंह लडाखमधील बर्फाळ शिखरावर पुशअप्स करताना दिसत आहेत. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे 17 हजार 500 फूट उंचीवर आहे. त्याच वेळी, येथे तापमान उणे 30 अंश आहे.

काय आहे ITBP ?

ITBP हे देशातील 5 केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी एक आहे. भारत-चीन युद्धादरम्यान ऑक्टोबर 1962मध्ये ITBPची स्थापना झाली. ITBP लडाखमधील काराकोरम खिंडीपासून अरुणाचल प्रदेशातील जचेप लापर्यंत चीनला लागून असलेल्या भारताच्या सीमेच्या 3,488 किमी लांबीचे रक्षण करते.

इंडो-तिबेट बॉर्डर कर्मचाऱ्यांचे फोटो समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, सैनिकांच्या प्रशिक्षणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ITBP जवान बर्फाळ भागात आणि उणे 25 अंश तापमानात उभे राहून सराव करताना दिसत होते.

 

A legendary Himveer : 17,500 feet at minus 30 degree Celsius’: 55-year-old ITBP personnel completes over 60 push-ups in Ladakh

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात