5G Revolution In India : कोरोना महामारीमुळे 2020 मध्ये बरेच काही बदलले. ऑनलाइन सुनावणी, ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाइन शिक्षण, ऑनलाइन डॉक्टरांचा सल्ला आणि टेलिमेडिसिनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. यादरम्यान वेगवान इंटरनेटची गरज भासू लागली. दूरसंचार कंपन्यांनी देशात 5 जी तंत्रज्ञान सुरू करण्याची तयारी चालवली आहे. मागील काही महिन्यांपासून 5जी संबंधित नोकऱ्यांमध्येही वेगाने वाढ होत आहे. 5G revolution In India, More Than 1.5 Lakh Employment; Know About life Changing Technology
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे 2020 मध्ये बरेच काही बदलले. ऑनलाइन सुनावणी, ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाइन शिक्षण, ऑनलाइन डॉक्टरांचा सल्ला आणि टेलिमेडिसिनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. यादरम्यान वेगवान इंटरनेटची गरज भासू लागली. दूरसंचार कंपन्यांनी देशात 5 जी तंत्रज्ञान सुरू करण्याची तयारी चालवली आहे. मागील काही महिन्यांपासून 5जी संबंधित नोकऱ्यांमध्येही वेगाने वाढ होत आहे.
डेटा अॅनालिटिक्स कंपनी ग्लोबल डेटाच्या मते, ऑक्टोबर ते डिसेंबर 2020 च्या तुलनेत भारतात 5-जी संबंधित रिक्त जागा जानेवारी-मार्च 2021 मध्ये दुपटीने वाढल्या. येत्या काही महिन्यांत या नोकऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, कारण 5 जीच्या आगमनाने अनेक क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल होतील.
एका सर्व्हेनुसार, भारतातील प्रत्येक व्यक्ती दरमहा 12 जीबी डेटा वापरते. पुढील पाच वर्षांत तो 25 जीबीपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. जागतिक दूरसंचार उद्योग मंडळाचा अंदाज आहे की, 2025 पर्यंत भारताचे 92 दशलक्ष मोबाईल ग्राहक असतील आणि त्यापैकी 8.8 कोटी ग्राहकांकडे 5 जी कनेक्शन असेल. 5 जी स्वीकारण्यासाठी पायाभूत सुविधा व सॉफ्टवेअरची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असेल. ज्यामुळे या क्षेत्रात बम्पर रोजगार निर्माण होईल.
5 जी एक अतिशय उच्च तंत्रज्ञान आहे, जे अत्यंत वेगवान वायरलेस नेटवर्क देते. पूर्ण एचडी मूव्ही काही सेकंदांत डाउनलोड होईल. तथापि, फक्त व्हिडिओ पाहण्यापेक्षा त्याचे इतर उपयोग जास्त आहेत. 5 जीच्या मदतीने ड्रायव्हरलेस ट्रान्सपोर्ट, स्मार्ट शहरे, व्हर्च्युअल रिअॅलिटी आणि खूप वेगवान रिअल टाइम अपडेट्स उपलब्ध होतील. याद्वारे एका कारला दुसऱ्या वाहनाशीही संपर्कही करता येईल आणि दोन्ही वाहनांमधील अंतर व वेग किती असावे याचा डेटाद्वारे निर्णय घेता येईल. 5जीमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता अधिक विकसित होईल आणि यामुळे स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशीन, होम स्पीकर आणि रोबोट्ससारखी सर्व यंत्रे अतिशय वेगवान आणि स्वयंचलित होतील.
5G revolution In India, More Than 1.5 Lakh Employment; Know About life Changing Technology
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App