विशेष प्रतिनिधी
पणजी – गोव्यात गेल्या नऊ दिवसांत १८ हजार ३३५ कोरोनाबाधित सापडले. त्यातील तब्बल ४९९ रुग्णांचा मृत्यूग झाला आहे. त्यामुळे या छोट्याश राज्यात आरोग्याची स्थीती नाजूक बनली आहे. 500 died in goa due to corona
गोव्यात कोरोनाला लगामा घातल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आधी वारंवार सांगत होते. मात्र नंतर राज्यात कोरोनाने प्रवेश केला आणि बघताबघता हाहाकार माजविला. आता मुख्यमंत्री डॉ. सावंत व आरोग्यमंत्री विश्वजित राणे वारंवार बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालय, सुपरस्पेशालिटी रुग्णालय आणि इतर कोव्हिड इस्पितळांना भेट देऊन पाहीँ करीत आहेत. त्यामुळे तेथील यंत्रणा सिरळीत काम करू लागली आहे. तसेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही काही प्रमाणात कमी होत आहे.
काल राज्यात तीन हजार ८७३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात १२०९ नवे कोरोनाबाधित सापडले. २,१६० रुग्ण आज बरे झाले आहेत. २४ तासांत ३१ बाधितांचा मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यांमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या २,२२८ एवढी आहे. सध्या राज्यात सक्रिय बाधितांची संख्या २२,९६४ एवढी आहे. २४ तासांमध्ये १३९ रुग्णांना घरी सोडण्यात आले. २०९ बाधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोव्यात पॉझिटिव्हिटी दर ३१.२१ टक्के आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण ८२ टक्के आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App