Mr. Dependable is Back ! श्रीलंका दौऱ्यासाठी राहुल द्रविड टीम इंडियाचे नवे कोच


टेस्ट खेळत नसलेल्या टीम इंडियाच्या प्लेअर्सना श्रीलंका दौऱ्यात संधी मिळणार आहे. शिखर धवन, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन व आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूंची श्रीलंका दौऱ्यात वर्णी लागण्याची शक्यता आहे.


या दौऱ्यात भारतीय संघ ३ टी-२० आणि ३ वन-डे खेळणार आहे. १३ ते २७ जुलै दरम्यान भारतीय संघाचा श्रीलंका दौरा रंगणार आहे.Mr. Dependable is Back ! New coach for team Indias Shrilanka tour


वृत्तसंस्था

नवी दिल्ली: क्रिकेट विश्वात प्रसिद्ध Mr.Dependable परत यात आहे .टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि सध्या NCA (National Cricket Academy) चा प्रमुख असलेल्या राहुल द्रविडकडे नवी जबाबदारी देणार असल्याचे वृत्त ANI वृत्तसंस्थेने दिले आहे .जुलै महिन्यात श्रीलंकेविरुद्ध सिरीजसाठी राहुल द्रविड टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत.

टीम इंडियाचे सर्व महत्वाचे प्लेअर्स इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यासाठी नवोदीत प्लेअर्सना संधी द्यायचं ठरवलंय. प्रशिक्षक रवी शास्त्री, विक्रम राठोड, भारत अरुण हे टीम इंडियासोबत इंग्लंडमध्ये असणार आहेत, त्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाला राहुल द्रविडचं मार्गदर्शन मिळणार आहे.

“टीम इंडियाचा कोचिंग स्टाफ हा इंग्लंडमध्ये असेल आणि श्रीलंका दौऱ्यासाठी जे प्लेअर्स आहेत त्यातील बहुतांश खेळाडू भारत अ संघाकडून राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळले आहेत. त्यामुळे या सर्व खेळाडूंसोबत वावरण्याचा आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचा अनुभव राहुल द्रविडकडे आहे”, ज्याचा फायदा श्रीलंका दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाला होईल अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने ANI ला दिली.

NCA ची जबाबदारी घेण्याआधी राहुल द्रविड भारत अ आणि १९ वर्षाखालील संघाचा प्रशिक्षक होता. महिन्याअखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाची निवड होण्याची शक्यता आहे. दौऱ्यावर जाण्याआधी टीम इंडिया क्वारंटाइन कालावधी पूर्ण करेल.

Mr. Dependable is Back ! New coach for team Indias Shrilanka tour

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात