विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : जगात १० कोटी टन कपड्यांचा कचरा


तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये कधी डोकावून पाहिले आहे काय? अनेक कपडे जुने झाल्याने, फॅशन संपल्याने किंवा कंटाळा आल्याने ते वापरणे तुम्ही सोडून दिले असणार. एका सर्वेक्षणानुसार महिलांच्या कपाटातील बारा टक्के कपडे वापराविना पडून असतात 100 million tons of clothing waste in the world

हे कपडे कपाटात ठेवायचाही कंटाळा आल्यास तुम्ही ते पिशव्यांत भरून कचऱ्यात टाकून देता. नंतर या कपड्यांचे काय होते? अमेरिकेत टाकून दिलेले एक कोटी तीस लाख टन कपडे दरवर्षी कचरा डेपोमध्ये जाऊन पडतात किंवा जाळले जातात. जगभरात सुमारे १० कोटी टन कपड्यांचा कचरा तयार होतो, तर हेच प्रमाण २०३० मध्ये १४ कोटी टन असेल! मग यावर उपाय काय?

ब्रिटनमधील लॉगबोरो विद्यापीठातील संशोधक सांगतात, सध्याची फॅशन इंडस्ट्री कपड्यांच्या निर्मितीसाठी रिसायकलिंग न होणाऱ्या पेट्रोलियम पदार्थांचा वापर करते व हे कपडे खूप कमी कालावधीसाठी वापरले जातात. ही व्यवस्था पाणी दूषित करते, वातावरणातील प्रदूषण करणारे घटक वाढवते व परिसंस्थेचेही नुकसान करते. फॅशन इंडस्ट्री जगभरातील दहा टक्के हरितगृह वायूंच्या निर्मितीस हातभार लावते, तब्बल एक अब्ज टन हरितगृह वायू वातावरणात सोडते.

कपड्यांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी लागते व हा उद्योग जगभरातील वीस टक्के सांडपाण्याची निर्मिती करतो. त्याचबरोबर ग्राहकही मागील पंधरा वर्षांच्या तुलनेत सध्या साठ टक्के अधिक कपडे खरेदी करत आहेत. जगभरात दरवर्षी सहा कोटी टन कपडे खरेदी केले जातात व २०५० पर्यंत हे प्रमाण सोळा कोटी टनांपर्यंत पोचेल. मात्र, जगभरात वापरल्या जाणाऱ्या कपड्यांपैकी केवळ बारा टक्यांसोळ चा पुनर्वापर होतो.

फॅशन सतत बदलत असल्याने कपड्यांचा वापर कमी होतो. आधुनिक कपडे दोन ते दहा वर्षे, अंतर्वस्त्रे व टी-शर्ट एक ते दोन वर्षे व सूट आणि कोट चार ते सहा वर्षे टिकतात. त्यामुळे त्यांचे रिसायकलिंग करणे हाच यावरील उपाय असल्याचे संशोधकांचे मत आहे.

100 million tons of clothing waste in the world

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात