पारले जी ३ कोटी बिस्कीट पुडे देशभर मोफत वाटणार


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना फैलावात देशभर लॉकडाऊन असताना कोणीही उपाशी राहू नये, या मोदी सरकारच्या उपक्रमाला पारले कंपनीने सकारात्मक प्रतिसाद देत आहे. येत्या तीन आठवड्यांमध्ये कंपनी पारले जी बिस्कीटाचे ३ कोटी पुडे मोफत वाटणार आहे. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी मयंक शहा यांनी ही माहिती दिली. लॉकडाऊन कालावधीत प्रत्येक आठवड्याला १ कोटी बिस्कीट पुडे वाटप या प्रमाणे तीन आठवड्यांमध्ये ३ कोटी बिस्कीट पुडे वाटण्यात येतील. सरकारी संस्थांची मदत यासाठी घेण्यात येईल, असे शहा यांनी सांगितले. कंपनीत सध्या ५०% मनुष्यबळ काम करते आहे. त्यांचे वेळापत्रक बदलले आहे पण कंपनी पूर्ण क्षमतेने उत्पादन करत आहे. या क्षमतेत कोणतीही कमतरता आलेली नाही. सरकारने यासाठी अन्न उत्पादन कंपन्यांना लॉकडाऊनमधून वगळले आहे, असे शहा यांनी स्पष्ट केले. लॉकडाऊनच्या सुरवातीला लोकांनी घाबरून जादा खरेदीला सुरवात केली. काही ठिकाणी साठेबाजीचाही प्रकार घडला पण कंपनीने उपलब्ध मनुष्यबळात संपूर्ण क्षमतेने बिस्कीट उत्पादन चालू ठेवल्याने तुटवडा पडला नाही. यापुढेही उत्पादन पूर्ण क्षमतेने सुरू राहील आणि साठेबाजी, अनावश्यक खरेदी टाळली तर गरजू व्यक्तींना माल उपलब्ध राहील, असेही त्यांनी देत सांगितले.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात