काँग्रेस आमदाराने गायले गोमुत्राचे गोडवे; कोरोनावर गोमुत्र परिणामकारक असल्याचा दावा


विशेष प्रतिनिधी

भोपाळ : मध्य प्रदेशातील श्योपूरचे काँग्रेस आमदार बाबू जंडेल यांनी गोमुत्राचे गोडवे गायले आहेत. एवढेच नाही तर २०० वर्षांपूर्वी भारतात कोरोना व्हायरसचा फैलाव झाला होता. गोमुत्र प्राशन केल्याने त्याला अटकाव झाला, असा दावा जंडेल यांनी केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर आपला व्हिडीओ अपलोड करून “गोमुत्र थेरपी” सांगितली आहे. ते म्हणातात, “मी गँरंटीने सांगतो, गोमुत्र प्राशन केले तर कोरोना तुमच्या पासून १० पावले दूरच राहील. गोमुत्रात कोणतीही महामारीची साथ रोखण्याची शक्ती आहे.” कोमट पाण्यात हळद टाकून प्यायल्यानेही कोरोनापासून बचाव होईल, असा अजब सल्लाही त्यांनी दिला आहे. दिल्लीत एका हिंदुत्ववादी संघटनेने गोमुत्र पार्टीचेही आयोजन केले होते. परंतु, गोमुत्राने कोरोना व्हायरसला प्रतिबंध होण्याचे कोणतेही वैद्यकीय पुरावे उपलब्ध झालेले नाहीत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय