विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवारांनी भाकीत वर्तविले आहे, की ठाकरे सरकार बरीच वर्षे टिकेल. महाविकास आघाडी सरकारने गेल्या वर्षभरात खूप चांगले काम केले आहे. पुढची अनेक वर्षे हे सरकार चालेल, असे पवार म्हणाले. ठाकरे – पवार सरकारने प्रकासित केलेल्या महाराष्ट्र थांबला नाही आणि थांबणार नाही’ या पुस्तकाचे प्रकाशन आज करण्यात आले. या कार्यक्रमात पवारांनी हे भाकीत वर्तविले.
पवारांनी केलेल्या राजकीय भाकितांचा आणि विधानांचा अर्थ नेहमी उलट घ्यायचा असतो, असे महाराष्ट्रातले राजकीय विश्लेषक मानतात. त्यामुळे पवारांनी आज केलेल्या राजकीय भाकितालाही त्या दृष्टीने महत्त्व आहे.
पवार म्हणाले, की भाजपाची हातातली सत्ता गेल्याने ते अस्वस्थ झाले. त्यानंतर चर्चा सुरु झाली की हे सरकार पडणार. मात्र उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली या सरकारने उत्तम काम केलं आहे. करोनाच्या काळातही त्यांनी महाराष्ट्र खूप चांगल्या पद्धतीने सांभाळला. आता वर्षपूर्तीनंतर चिकित्सा जास्त केली जाते आहे. कारण महाराष्ट्रात झालेला हा पहिलावहिला प्रयोग आहे. पाच वर्षे सरकार चालेल एवढा कद्रूपणा का करायचा? पुढची अनेक वर्षे हे सरकार चालेल. पवारांच्या या विधानची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
करोनाचं संकट जगावर आलं. तरीही महाराष्ट्र थांबला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खूप चांगलं नेतृत्त्व केले. खरेतर मुख्यमंत्र्यांना प्रशासनाचा अनुभव नाही. महाविकास आघाडीचा प्रयोग जेव्हा झाला तेव्हा त्यांना हे सगळे कसे जमेल अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती, याची आठवण पवारांनी विशेषत्वाने करून दिली.
मात्र त्यांना प्रशासकीय अनुभव नसला तरीही त्यांच्या चातुर्यात काहीही कमतरता नाही अशी शाबासकी पवारांनी त्यांना दिली. विविध प्रयोग करुन झालेलं सरकार हे महाराष्ट्राने तीनवेळा पाहिली. सर्वात पहिली जबाबदारी माझ्यावर होती. १९७८ मध्ये झालेला तो प्रयोग हा तसा सोपा राजकीय प्रयोग होता. कारण त्यातले मोजके लोक होते की ज्यांना प्रशासनाचा अनुभव होता. त्यामुळे राज्याच्या प्रमुखांकडून त्यांच्या फार अपेक्षा नव्हत्या. ते अत्यंत संतुष्ट असायचे, त्यामुळे ते राज्य चालवणे तितकेसे कठीण नव्हते. नंतरच्या काळात आणखी एक सरकार येऊन गेले.
मात्र त्या सरकारच्या मागे बाळासाहेब ठाकरेंसारखं खंबीर नेतृत्त्व ठामपणे उभे होते म्हणून ते सरकार चालले. त्यांनी मार्गदर्शक म्हणून उत्तम काम केले. त्यामुळे त्या सरकारलाही कोणतीही अडचण आली नाही, याची आठवण पवारांनी करवून दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more