ही तर “मानस श्रींची” इच्छा…!!


‘त्या’ लेखाचे शीर्षक होते “ही तो श्रींची इच्छा”! ज्येष्ठ संपादक कै. गोविंदराव तळवलकरांचा हा लेख प्रसिद्ध झाला आणि श्रींची इच्छा मानून “मानस श्रींनी” वसंतदादा पाटलांचे सरकार पाडले. त्यावेळी गोविंदराव संपादक होते. विद्वान होते, नेहरूप्रेमी होते. पण लेखणी यशवंतरावांच्या अंकित होती. इतिहास घडून गेल्यावर मात्र यशवंतरावांनी हात वर केले. त्यावेळी गोविंदराव होते, आता संजय राऊत आहेत. ते धडाडीचे आहेत. निष्ठा आणि लेखणी बाळासाहेबांनी घडविलेली आहे. (होती.) आता मात्र लेखणी ‘सिल्वर ओक’च्या अंकित आहे..!


 

विनय झोडगे

कितीही डोके आपटा, हे सरकार पडणार नाही, सध्याचे सामनाकार म्हणालेत… सामनाकार “असे” म्हणालेत ना… म्हणजे नक्की “तसे” होणार…!! सध्याच्या सामनाकारांच्या राजकीय बुद्धीचा स्विच सिल्वर ओकवरून ऑन ऑफ होतो. ते म्हणालेत ना, सरकार पडणार नाही… याचा अर्थच सरकार पडण्याच्या प्रक्रियेला “बाहेरून” नव्हे “आतून” सुरवात झाली आहे, असे समजण्यास वाव आहे.

एरवी सिल्वर ओक जे विधान करते त्याच्या विरुद्ध अर्थच घ्यायचा असतो ना…!! सध्या सिल्वर ओक सामनाच्या लेखणीतून बोलते. म्हणूनच त्या लेखणीतून येणाऱ्या विधानाचा विरुद्ध अर्थ लावणे भाग आहे.

राज्यपालांना वाटेल तो निर्णय घेऊ द्या… असा त्रागाही करून झाला आहे. राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी मातोश्रीचा जीव कासावीस होतोय आणि महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षावर म्हणजे भाजपवर खापर फोडले जातेय… जाऊ द्या. बुद्धीचा स्वीच सिल्वर ओकवरून ऑन ऑफ व्हायला लागला की एवढे तर चालायचेच ना…!!

राज्यपाल नियुक्तीचे एक मोठे निमित्त भाजपपेक्षा सिल्वर ओकच्या हाती लागले आहे. कोरोनाच्या निमित्ताने मातोश्रीची पकड प्रशासनावर घट्ट होत चालली होती. ती ढिली असल्याचे दाखवायला पालघरचे निमित्त मिळाले. गृह खात्याची जबाबदारी राष्ट्रवादीकडे असतानाही टीकेच्या बंदूका काँग्रेस, सोनिया, मातोश्रीकडे रोखल्या गेल्या. राज्यपाल नियुक्तीच्या निमित्ताचे असेच होण्याची शक्यता आहे. टीकेच्या बंदूका भाजपकडे रोखल्या जातील. मधल्यामध्ये मुख्यमंत्र्यांची खुर्ची अस्थिर केल्याची खुजली मात्र राष्ट्रवादी भागवून घेईल.

पण या निमित्ताने एका जुन्या लेखाची आणि वादाची आठवण झाली… लेखाचे शीर्षक होते “ही तो श्रींची इच्छा”! ज्येष्ठ संपादक कै. गोविंदराव तळवलकरांचा हा लेख प्रसिद्ध झाला… आणि श्रींची इच्छा मानून “मानस श्रींनी” मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांचे सरकार पाडले. त्यावेळी गोविंदराव संपादक होते. विद्वान होते. व्यासंगी होते. रॉयिस्ट होते. नेहरूप्रेमी होते. पण लेखणी यशवंतरावांची अंकित होती. त्यांनी लिहिले, “ही तो श्रींची इच्छा”… पुढे सगळे घडले तो इतिहास झाला… इतिहास घडून गेल्यावर मात्र यशवंतरावांनी हात वर केले होते. वसंतदादांचे सरकार पाडायला माझा पाठिंबा नव्हता, असे ते नंतर म्हणाले होते.

त्यावेळी गोविंदराव होते, आता राऊत आहेत. ते धडाडीचे आहेत. निष्ठा आणि लेखणी बाळासाहेबांनी घडविलेली आहे. (होती.) आता मात्र लेखणी ‘सिल्वर ओक’च्या अंकित आहे. म्हणूनच history repeat होण्याची शक्यता आहे. जोड्या तशाच आहेत, यशवंतराव – गोविंदराव आणि आता सिल्वर ओक – संजय राऊत…!! त्यावेळी यशवंतराव करून सवरून नामानिराळे राहिले. सिल्वर ओक तर त्याही पलिकडे केव्हाच गेले आहे… राज्यपाल नियुक्तीवरून नाटक खेळून सिल्वर ओक मातोश्रीची गेम करायलाही मागे पुढे पाहणार नाही.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात