विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातले शेतकरी, बारा बलुतेदार, असंघटित कामगार कोरोनाच्या संकटामुळे कोलमडून गेले आहेत. तरीही ते संकटाशी धैर्याने मुकाबला करत आहेत. या वर्गासाठी राज्य सरकारने ५० हजार कोटी रुपयांचे पॅकेज तातडीने द्यावे, अशी मागणी प्रदेश भाजपने आज केली.
भाजपने राज्य सरकारच्या अपयशाविरोधात महाराष्ट्र बचाव आंदोलन केले. त्यावेळी ही प्रमुख मागणी करण्यात आली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे हे नेते प्रदेश कार्यालयातून या आंदोलनात सहभागी झाले होते. अन्य नेते विविध ठिकाणांहून आंदोलनात सहभागी झाले होते.
महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्ण, सर्वाधिक मृत्यू!आरोग्य व्यवस्था पूर्णत: कोलमडलेली आणि शासनाची निष्क्रियता, हे किती दिवस सहन करायचे, असा सवाल फडणवीस यांनी केला. भाजपने राज्य सरकारसोबत सातत्याने सहकार्याची भूमिका घेतली पण सरकार कोरोनाचा मुकाबला करण्यात अपयशी ठरले आहे. हे आम्ही जनतेसमोर आणतोय, असे त्यांनी सांगितले.
जनता सहन तरी किती करणार?आज मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात आंदोलनात सहभाग घेतला. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत, कायदा-सुव्यवस्थेवर कुठलाही ताण न आणता, आपल्या घराच्या अंगणात भाजपा कार्यकर्ते आज राज्यभर जनतेला भेडसावत असलेल्या ज्वलंत प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधत आहेत. हे आंदोलन लाखो कार्यकर्त्यांनी यशस्वी केले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
ते म्हणाले, “राज्यात शेतमाल खरेदी थांबली आहे. शेतमाल घरातच पडून आहे. खरीपाचा हंगाम तोंडावर असताना त्याची अवस्था वाईट आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकर्यांना तत्काळ मदत दिली पाहिजे. हातावर ज्यांचे पोट आहे, अशांना तत्काळ पॅकेज देण्याची गरज आहे.
योगी जी के कामों बाधा डालनागुजरात में बेबुनियाद बवाल खडे करनाशिवराजजी को परेशान करनानितीशकुमार जी के खिलाफ मुहिम छेडना और मोदी जी को तो रात दिन सिर्फ गाली देनालेकिन,जब नाकामायाब ठाकरे सरकार के खिलाफ @BJP4Maharashtra बोलता है, तो राजनीती होती है।#MaharashtraBachao pic.twitter.com/IXI6SCku1x— Vijaya Rahatkar (@VijayaRahatkar) May 22, 2020
योगी जी के कामों बाधा डालनागुजरात में बेबुनियाद बवाल खडे करनाशिवराजजी को परेशान करनानितीशकुमार जी के खिलाफ मुहिम छेडना और मोदी जी को तो रात दिन सिर्फ गाली देनालेकिन,जब नाकामायाब ठाकरे सरकार के खिलाफ @BJP4Maharashtra बोलता है, तो राजनीती होती है।#MaharashtraBachao pic.twitter.com/IXI6SCku1x
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App