भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) कोविड-19 साठी अँटीबॉडी शोधण्यासाठी स्वदेशी आयजीजी एलिसा चाचणी कोविड कवच एलिसा विकसित केली आहे. त्यामुळे व्हायरसचा प्रादुर्भाव शोधण्यासाठी चाचण्या करता येणार आहेत. चाचण्यांच्या स्वदेशी किटमुळे खर्चही कमी होणार असून देशातील जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी करता येणार आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) कोविड-19 साठी अँटीबॉडी शोधण्यासाठी स्वदेशी आयजीजी एलिसा चाचणी कोविड कवच एलिसा विकसित केली आहे. त्यामुळे व्हायरसचा प्रादुर्भाव शोधण्यासाठी चाचण्या करता येणार आहेत. चाचण्यांच्या स्वदेशी किटमुळे खर्चही कमी होणार असून देशातील जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी करता येणार आहे.
या चाचणीचे प्रमाणीकरण मुंबईत दोन ठिकाणी करण्यात आले आहे. चाचणीमध्ये एकाच वेळी 2.5 तासांमध्ये 90 नमुन्यांची चाचणी घेता येईल. शिवाय, जिल्हा पातळीवरही एलिसा आधारित चाचणी सहज शक्य आहे. रिअल-टाइम आरटी-पीसीआर चाचणीच्या तुलनेत जैव-सुरक्षा आणि जैव-संरक्षण आवश्यकता देखील कमी आहेत.
जगभरातील देशांकडून विविध प्रकारच्या निदान चाचण्यांची वाढती मागणी आहे. कोविड-19 साठी बहुतांश निदान सामग्री इतर देशांतून भारतात आयात केली जाते. म्हणूनच भारतीय वैज्ञानिक कोविड-19 ला कारणीभूत असलेल्या सार्स -सीओव्ही –2 साठी स्वदेशी निदान पद्धती विकसित करण्याचे अथक प्रयत्न करत आहेत. एनआयव्हीच्या शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेतून पुष्टी झालेल्या रूग्णांमधून सार्स -सीओव्ही –2 विषाणू यशस्वीरित्या वेगळे केले. यामुळे सार्स -सीओव्ही -2 साठी स्वदेशी निदान विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन याबाबत माहिती देताना म्हणाले, आयसीएमआरने झायड्स कॅडिलाबरोबर एलिसा टेस्ट किटच्या मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी भागीदारी केली आहे. पुणे येथील आयसीएमआर-एनआयव्ही येथे विकसित केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी हे तंत्रज्ञान झायड्स कॅडिलाकडे हस्तांतरित केले आहे. एलिसा चाचणी किटची मंजुरी आणि व्यावसायिक उत्पादन वेगाने करण्याचे आव्हान झेडसने सक्रियपणे स्वीकारले आहे. त्यामुळे ते लवकरात लवकर वापरासाठी उपलब्ध होतील. या चाचणीला ‘कोविड कवच एलिसा’ असे नाव देण्यात आले आहे. विक्रमी वेळेत मेक इन इंडियाचे हे एक उत्तम उदाहरण आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App