पालघर मॉब लिचिंगच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य काशीराम चौधरी, पंचायत समिती सदस्य सीताराम चौधरी, कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते सुनिल रावते ल, रामदास असारे यांचा समावेश आहे. त्यांची नावे जाहीर करावीत अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : पालघर मॉब लिचिंगच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य काशीराम चौधरी, पंचायत समिती सदस्य सीताराम चौधरी, कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते सुनिल रावते रामदास असारे यांचा समावेश आहे. त्यांची नावे जाहीर करावीत अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
पालघरच्या घटनेनंतर पोलिसांनी १०१ व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यापैकी कोणीही मुस्लिम नाही असे सांगणारे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ज्या तत्परतेने व घाई घाईत गुन्हेगारांची यादी जाहीर केली, त्याच तत्परतेने या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोण कोण आहेत व ते कोणाशी संबंधित आहेत, त्यांचे फोटो आणि नावे त्याच तत्परतेने जनतेसमोर जाहीर करावीत असे आवाहन दरेकर यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना केले.
गृहमंत्र्यांनी नावे जनतेसमोर जाहीर केल्यास यामध्ये कोणाचा हात आहे हे स्पष्ट होईल असेही दरेकर यांनी ठामपणे सांगितले.
‘क्षमहाराष्ट्रात साधूंची भगवी वस्त्रे रक्ताने भिजली याचे राजकारण करू नये,” अशी टीका सामना मधून करण्यात आली असून त्याचा समाचार घेताना दरेकर यांनी सांगितले, “भगवी वस्त्रे रक्ताने लाल झाली आहेत त्याचे काय…भगव्यावर झालेला हा लाल रक्ताचा हल्ला भगवी विचारधारा घेऊन राज्यकारभार करणा-यांना आता धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणारा वाटतो, कारण खुर्ची ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेपेक्षा मोठी व महत्त्वाची ठरल्याचे दिसत आहे,” अशी टिकाही दरेकर यांनी केली.
कोरोनाच्या भीषण पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना बाधित रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसाच मृत्यूदरही वाढतोय हे गंभीर आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘आयसीएमआर’ च्या निकषानुसार चाचणी करण्याची केलेली सूचना योग्य आहे. ज्यांना रुग्णालयाची सेवा उपलब्ध झाली नाही, असे कोरोना न झालेले शेकडो रुग्ण मृत्यूमूखी पावले आहेत, त्यामुळे आता सरकारने ती यादीही जाहिर करावी, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
कोरोना सारख्या संकटकाळातही महाविकास आघाडीचे सरकार सापत्न भावनेने व सूडबुध्दीने वागत असल्याचा आरोप करताना दरेकर यांनी सांगितले की, भंडारा मध्ये भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी बैठक मागितली असता जिल्हाधिका-यांनी वेळ नसल्याचे सांगितले. मात्र त्याचवेळेस सध्या लोकप्रतिनिधी नसलेले राष्ट्रवादी कॉंग्रसेचे नेते प्रफुल्ल पटेल हे मुंबईसारख्या रेड झोनमधून ग्रीन झोनमधून भंडारा येथे गेले असताना जिल्हाधिका-यांनी त्यांना बैठक दिली. रेड झोनमधून प्रफुल्ल पटेल ग्रीन झोन मध्ये कसे गेले असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे, अशी टिकाही त्यांनी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App