ठाकरे सरकार अपयशातून अस्थिरतेकडे; खुंटा हलवून बळकट करण्याचा मनसूबा

शरद पवार यांची ‘मातोश्री’वर रात्री खलबते; राऊत यांची नेहमीसारखी भाजपवर टीका


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात, विशेषत: मुंबईत कोरोनाचा कहर सुरू असताना त्याला आळा घालण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार संपूर्ण अपयशी ठरले आहे. मात्र काल दिवसभरातील राजभवनात घडलेल्या घडलेल्या भेटीगाठी आणि मध्यरात्रीची मातोश्रीवरील बैठक यातून ठाकरे सरकारच्या अपयशाभोवती फिरणारी चर्चा सरकारच्या अस्थिरतेकडे वळविण्याचा डाव शरद पवारांसह महाआघाडीच्या नेत्यांनी रचल्याचे स्पष्ट होत आहे.

या अस्थिरतेच्या चर्चेचा लाभ खुंटा हलवून बळकट करण्यासारखा करवून घेण्याचा देखील शरद पवारांचा मनसूबा दिसतो. सध्या सरकार सद्यस्थितीत वाचविण्याचा आणि त्यावर आपली पकड मजबूत करण्याचा शरद पवारांचा डाव असू शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

ठाकरे सरकारच्या पाठिंब्याचा मुद्दा, सरकारचे अपयश यावरून काँग्रेसमधला मोठा गट नाराज आहे. पृथ्वीराज चव्हाण दररोज ते उघडपणे सूचित करत असतात. त्यातच खुद्द उद्धव ठाकरे हेच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाबरोबर political patch up करून राज्यात नवे सरकार आणू शकतात, अशी कुजबूज सुरू झाली होती. ही कुजबूज ऐन रंगात येण्यापूर्वीच शरद पवारांनी मातोश्रीपर्यंत जाण्याच्या हालचाली केल्याचे बोलले जात आहे.

 

पवारांचा पाच दशकांचा अनुभव, पंतप्रधानही पवारांचे मार्गदर्शन घेतात, ही विधाने पत्रकार परिषदांमध्ये फेकण्याची आहेत. परंतु, कोरोनाच्या कहरात राज्याच्या तिजोरीत खडखडात असताना केंद्राच्या ठोस मदतीशिवाय राज्य सरकार चालविणेही कठीण आहे, ही राजकीय वस्तुस्थिती असल्याचेही कालच्या आणि आजच्या घडामोडी निदर्शक ठरत आहेत.

त्यातही काँग्रेसमधील नाराजी दूर करता येत नाही. महाआघाडीतील विसंगती मिटवता येत नाहीत. अशा स्थितीत भाजपवर शरसंधान करण्याचा मार्ग संजय राऊत यांनी काढला आहे. सरकारचे अपयश झाकून भाजपवरच counter attack करण्याचे धोरण राऊतांनी स्वीकारले आहे. अर्थात भाजप त्याला काय प्रत्युत्तर देतोय, ते पाहावे लागेल. पण त्याचवेळी शिवसेनेला अडचणीत आणणाऱ्या रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची स्तुती करण्याची खेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे.

या सर्व प्रक्रियेत पवारांनी कालच्या मातेश्रीवरील बैठकीत, उद्धव ठाकरे यांनी आधीच नाकारलेले साखर कारखान्यांसाठीच्या पँकेजची मागणी पुढे रेटली असावी काय, याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राज्यात एवढ्या राजकीय हालचालींनंतरही केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी आपले पत्ते उघड केलेले नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या महाआघाडी सरकारचे स्थिर – अस्थिरतेची खरी मेख तिथेच तर आहे.

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात