चिंताजनक : महाराष्ट्र बनला चिनी विषाणूची राष्ट्रीय राजधानी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतातील चिनी विषाणूग्रस्तांची संख्या 20 हजारांपेक्षा जास्त झाली असून देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आणि त्या खालोखाल शेजारच्या गुजरातेत आहेत. वर्ल्डमीटरने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारपर्यंत भारतात चिनी विषाणूग्रस्तांची एकूण संख्या 20 हजार 80 वर पोचली. चिनी विषाणूने घेतलेल्या बळींची संख्या 645 झाली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. यात सद्यपरिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे

चिनी विषाणूचा सर्वाधिक संसर्ग महाराष्ट्रात झाला असून रुग्णांची संख्या 5, हजार 218 झाली आहे. त्यानंतर रुग्ण संख्येच्या बाबतीत गुजरात, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशात या राज्यांचा क्रमांक लागतो.

दरम्यान जगात चिनी विषाणूचा संसर्ग आतापर्यंत तब्बल 25 लाख 57 हजार 181 लोकांना झाला आहे. बळी पडलेल्यांची संख्या 1 लाख 77 हजार 641 इतकी आहे, अशी माहिती वर्ल्डोमीटरने दिली आहे. चीनमध्ये उद्रेक झालेल्या या विषाणूचे सर्वाधिक रुग्ण सध्या अमेरिकेत 8 लाख 4 हजार 194 इतके आहेत. त्या पाठोपाठ स्पेन (2 लाख 4 हजार), इटली (1 लाख 83 हजार 957), फ्रान्स (1 लाख 56 हजार 495) आणि जर्मनी (1 लाख 48 हजार 7) हे देश आहेत. ‘ब्लूमबर्ग’च्या चिनी विषाणूवरील लशीच्या मानवी चाचण्या या आठवड्यात इंग्लंडमध्ये सुरू होतील. दरम्यान, भारतात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने राज्यांना सल्ला दिला आहे की, वेगवान अँटीबॉडी टेस्ट किटचा पुढील दोन दिवस वापर थांबवावा. कारण हे कीट प्रभावी नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

सर्वाधिक रुग्ण संख्येची राज्ये

महाराष्ट्र – 5,218
गुजरात – 2,178
दिल्ली – 2,156
राजस्थान – 1659
तामिळनाडू – 1596
मध्य प्रदेश – 1,552
उत्तर प्रदेश – 1,294
तेलंगणा – 928
आंध्रप्रदेश – 757
केरळ – 427
पश्चिम बंगाल – 423
कर्नाटक – 418
जम्मू आणि काश्मीर – 380
हरयाणा – 254
पंजाब – 245
बिहार – 126

या शिवाय अंदमान निकोबार बेटे (16), अरुणाचल प्रदेश (1), आसाम (35), चंडीगढ़ (37), छत्तीसगड (36), गोवा (7), हिमाचल प्रदेश (39), झारखंड (45), लडाख (18), मणिपुर (2), मेघालय (12), मिझोराम (12) आणि ओरिसा (79), त्रिपुरा (2), उत्तराखंड (46) आणि पुद्दचेरी (7) या छोट्या राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशांमध्येही चिनी विषाणूचा संसर्ग आढळला आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात