विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : काश्मीरमध्ये गुरुवारी पुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती टळली. त्यासारखा होणारा हल्ला जवानांनी वेळीच रोखल्याने मोठा अनर्थही टळला आहे. पुलवामा येथे एका सँट्रो गाडीत ६० किलो IED स्फोटके सापडली असून त्याची जवानांनी वेळीच दखल घेऊन गाडीतील स्फोटक वेळीच निकामी केली.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याची माहिती दिली आहे. पुलवामा पोलीस, सीआरपीएफ आणि आर्मी यांनी एकत्रितपणे यासंबंधित प्रकरणावर पावले उचलत गाडीचा तपास केला. त्यामध्ये IED स्फोटक असल्याचे समोर आले. त्याचवेळी बॉम्ब डिस्पोडल स्क्वायड यांना बोलवण्यात आले होते.
एक गाडी दहशतावादी चालवत होते. त्यांना जवानांनी अडविले. सुरुवातीला गोळीबार करण्यात आला. त्यानंतर गाडी सोडून ते पळाले.
हे प्रकरण आता NIA यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. ही गाडी पुलवामा मधील रजपुरा रोड जवळील शादीपुरा येथे पकडण्यात आली आहे. गाडीवरील क्रमांक हा कुठआ येथील रजिस्ट्रर केलेला होता. जम्मू-कश्मीर पोलिसांनी या गाडीला ट्रॅक केल्यानंतर त्यात बॉम्ब लावल्याचे समोर आले. बॉम्ब डिस्पोजल युनिट यांना बोलावण्यात आल्यानंतर आजूबाजूचा परिसर खाली करण्यात आला होता.
यापूर्वी हेरगिरी करण्यासाठी पाकिस्तानातून प्रशिक्षित एक कबूतर जम्मू कश्मीर मधील कठुआ जिल्ह्यातील आंतराराष्ट्रीय सीमेवर पकडण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी सोमवारी म्हटले होते की, कबुतरासह एक कोड पाठवण्यात आला होता. त्यानंत र हीराननगर सेक्टरमधील मनयारी गावातील काही लोकांनी या कबुतराला पकडले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App