कोरोना व्हायरसविरुध्दच्या लढाईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यापासून संपूर्ण मंत्रीमंडळ दररोज भावनातिरेकाचे प्रदर्शन करत असताना प्रत्यक्ष जमीनीवर मात्र पुरेशी तयारीच केली नसल्याचे दिसून येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावाने असलेल्या ट्रॉमा हॉस्पीटलमधील परिचारिकांना कोरोना प्रतिबंधीत ड्रेस पुरविणे दूरच जेवण्याचीही व्यवस्था होत नसल्याचे दिसून आले आहे. या कठीण प्रसंगीही परिचारिकांना आंदोलन करावे लागले.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना व्हायरसविरुध्दच्या लढाईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यापासून संपूर्ण मंत्रीमंडळ दररोज भावनातिरेकाचे प्रदर्शन करत असताना प्रत्यक्ष जमीनीवर मात्र पुरेशी तयारीच केली नसल्याचे दिसून येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावाने असलेल्या ट्रॉमा हॉस्पीटलमधील परिचारिकांना कोरोना प्रतिबंधीत ड्रेस पुरविणे दूरच जेवण्याचीही व्यवस्था होत नसल्याचे दिसून आले आहे. या कठीण प्रसंगीही परिचारिकांना आंदोलन करावे लागले.
संपूर्ण देशात आरोग्य कर्मचार्यांच्या लढाईचे कौतुक होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दररोज आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये त्यांचे कौतुक करत आहेत. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे भावनेने ओथंबलेली पत्रे लिहित आहेत. मात्र, या परिचारिकांचा सवाल आहे की ‘उद्या आम्हाला करोना झाला तर घरच्या लहान मुलांची काळजी कोण घेणार? आम्हाला करोनासाठी संरक्षित ड्रेस मिळणार की नाही?’
संपूर्ण देशातच कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. दिल्लीतील मोहल्ला क्लिनिक आणि काही मोठ्या रुग्णालयांमधील डॉक्टरही कोरोना बाधित झाले आहेत. राजस्थानातील भिलवाडा येथे तर वैद्यकीय व्यावसायिकच त्याची शिकार बनले आहेत. मात्र, महाराष्ट्रातील रुग्णालयांमध्ये मात्र अद्याप पुरेशी काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सामान्य विभागात दाखल झालेल्या रुग्णाने करोनाची माहिती लपवल्यामुळे डॉक्टरांसह १४ लोकांना विलगीकरण कक्षात दाखल करावे लागले.
पण बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांचा कक्ष तयार केला आहे. सुमारे २०० खाटांची तयारी आहे. करोनाबाधित रुग्णांची व्यवस्था पाहण्यासाठी ८० परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यादेखील जीवावर उदार होऊन कोरोना विरुध्दच्या लढाईत उतरल्या आहेत. मात्र, त्यांची अवस्था वेगळी आहे. बुधवारी त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला. ‘‘८० परिचारिका असताना आम्हाला केवळ पाच करोनासंरक्षित ड्रेस पाठविण्यात आले. आम्ही काम कसे करायचे ?’’ असा सवाल करीत त्यांना घोषणाबाजी करावी लागली.८० परिचारिका असताना आम्हाला केवळ पाच करोनासंरक्षित ड्रेस पाठविण्यात आले. आम्ही काम कसे करायचे ? असा संतप्त सवाल त्यांनी केला.
आम्ही करोना रुग्णांवर उपचार करायला तयार आहोत. काम करण्यासाठी आम्ही कायम सज्ज आहोत, पण आमच्यासाठी किमान करोना सूट तसेच आवश्यक ते मास्क वगैरे पुरेसे साहित्य तरी पालिकेने दिले पाहिजे. उद्या आम्हाला करोना झाल्यावर आमची काळजी कोण घेणार? असा सवालही या परिचारिकांनी पालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे कोणीही उपाशी राहणार नाही असे म्हणणार्या सरकारने या परिचारिकांच्या जेवणाखाण्याचीही योग्य काळजीही घेतली नाही. बुधवारी वेळेत जेवण न पाठवल्यामुळे त्यांच्यावर उपाशी राहाण्याची वेळ आली. पालिकेने दुपारी उशिरा जेवण पाठवले व तेही आंबलेले जेवण होते, असे येथील परिचारिकांनी सांगितले. या परिचारिकांनी मात्र अत्युच्च दर्जाच्या सेवाभावाचे उदाहरण देत स्वत: उपाशी राहून रुग्णालयाच्या कॅन्टीनमधून ९० रुग्णांसाठी जेवण करून रुग्णांना दिले.
बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयाच्या परिचारिका एकत्र येऊन बोलल्या म्हणून ही गोष्ट उघड झाली. मात्र, राज्यातील सर्वच शहरांतील रुग्णालयांत हिच परिस्थिती आहे. परिचारिका आणि डॉक्टरही प्रचंड धास्तावलेले आहेत. प्रत्येक येणारा रुग्ण कोरोना संशयित असू शकतो, हे माहित असूनही ते काम करतात. उपचार सुरू करतात. मात्र, त्यांना पुरेशी साधनसामुग्री पुरविली जात नाही. त्यामुळेच आता भावनेने ओथंबलेली वक्तव्ये खूप झाली. मंत्र्यांनी प्रत्यक्ष जमीनीवर येऊन कोरोना विरुध्द लढण्यासाठी वैद्यकीय कर्मचार्यांना आवश्यक सुविधा पुरवाव्यात अशी मागणी होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App