कार्तिक कारंडे
नवी दिल्ली : सोमवार, दि. ६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता चीनी व्हायरसच्या जगभरातील रुग्णांची संख्या होती ११ लाख ३६ हजार ८५१ आणि मृत्यूंची संख्या होती तब्बल ६२,९५५. सर्वाधिक कहर झालाय तो सर्वात बलाढ्य देश, एकमेव महासत्ता अमेरिका. तब्बल २ लाख ७३ हजार ८०८ रूग्ण आणि ७०२० मृत्यू… याउलट १३० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतामधील रूग्णांची संख्या होती ४०६७ आणि मृत्यू आहेत १०९. जर तबलिगींच्या मरकसचे प्रकरण उद्भवले नसते तर भारताची संख्या कदाचित निम्म्याच्या आसपास कमी झाली असती..!
जगाच्या, विशेषतः अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली आदी विकसित देशांच्या तुलनेत भारतातील प्रादुर्भाव खूपच अत्यल्प आहे. म्हणजे जागतिक रूग्ण संख्येच्या फक्त ०.३५ टक्के, तर मृत्यूची संख्या फक्त ०.१७ टक्के. एक नजर टाकू या भारतातील आणि जगातील प्रमुख देशांमधील स्थितीची…
असे असले आणि ‘कम्युनिटी संपर्क’ (थर्ड स्टेज) अद्याप चालू झालेला नसल्याचा केंद्र सरकारचा दावा असला तरी पुढील दहा- पंधरा दिवस भारतासाठी अत्यंत महत्वाचे असतील, असे तज्ज्ञ मानत आहेत. त्यामुळेच कोणत्याही आरोग्य आणीबाणीला सामोरे जाण्याची तयारी भारताने ठेवली पाहिजे. खरोखरच चीनी व्हायरसचा विस्फोट झालाच तर कशी आहे भारताची तयारी? केंद्र व राज्य सरकारे, माध्यमे, सोशल मीडिया यांच्या माध्यमांतून मिळविलेल्या वैद्यकीय तयारीच्या तपशीलावर हा दृष्टिक्षेप :
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रानुसार, ही आकडेवारी दि. ३ एप्रिलपर्यंतची आहे. त्यात दररोज भरच पडत आहेत. विशेषतः ‘पीपीई’च्या (व्यक्तिगत संरक्षक साधने) पुरवठ्याचा प्रश्न असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातून समजते. आतापर्यंत फक्त सरकारी संस्थेमधूनच या ‘पीपीई’चा पुरवठा होत होता; पण आता आवश्यकता लक्षात घेऊन सरकारने खासगी उत्पादकांकडून विकत घेण्यास परवानगी दिल्याने ‘पीपीई’चा पुरवठा वेगाने सुरू झालेला आहे. व्हेंटिलेटरची स्थितीही तशीच आहे. सध्या १९ हजार व्हेंटिलेटर यासाठी राखीव ठेवलेले आहेत; पण आतापर्यंत फक्त शंभर व्हेंटिलेटरचा उपयोग झालेला असल्याचे आकडेवारी आहे. तशीच काही स्थिती आयसीयू बेडसची आहे. प्रारंभी चाचण्यांची संख्या खूपच कमी होती. म्हणजे दहा लाख लोकांमागे फक्त २९ जणांच्या चाचण्या होत होत्या. पण आता हे प्रमाण दुपटीवर गेले आहे, कारण प्रतिदिन चाचण्या करण्याची क्षमता दहा हजारांवर पोहोचली आहे, जी जगामध्ये सर्वाधिक जास्त क्षमता आहे! एकंदरीत आरोग्य मंत्रालयानुसार, वैद्यकीय तयारी पुरेशी होत आहे आणि कोणत्याही चीनी व्हायरसच्या विस्फोटाला तोंड देण्याची तयारी भारतामध्ये झालेली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App