महाराष्ट्रातल्या कोरोना चाचण्यांची संख्या एक लाखावर; एकूण रुग्णसंख्या साडे सहा हजारांच्या पुढे ; राज्यात मुंबई, पुणे बनले हॉटस्पॉट


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शुक्रवारी राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत ३९४ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ६ हजार ८१७ झाली आहे. आज ११७ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरातल्या बर्या झालेल्या रुग्णांची संख्या ९५७ झाली. सध्या ५ हजार ५५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत पाठवलेल्या १ लाख २ हजार १८९ नमुन्यांपैकी ९४ हजार ४८५ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले तर ६८१७ जण पॉझिटिव्ह आले. सध्या राज्यात १ लाख १९ हजार १६१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८,८१४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

शुक्रवारी राज्यात १८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३०१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील ११, पुणे येथे ५ तर मालेगाव येथे २ मृत्यू झाले आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी १२ पुरुष तर ६ महिला आहेत.

आज झालेल्या १८ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ९ रुग्ण आहेत तर ६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ३ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १८ मृत्यूंपैकी १२ रुग्णांमध्ये ( ६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

सध्या राज्यातील कोरोना आजाराचा मृत्यूदर हा ४.४ टक्के असल्याचे टोपे म्हणाले. राज्यातील २६९ मृत्यूंचे वयोगटानुसार विश्लेषण केले असता ५० वर्षांखालील व्यक्तींचा मृत्यूदर हा कमी आढळून येतो, विशेषतः २१ ते ३० वर्षे वयोगटात मृत्यूदर ०.६४ टक्के इतका आहे तर त्यापुढील वयोगटात मृत्यूदर वाढताना दिसून येतो. ६१ ते ७० या वयोगटात मृत्यूदर सर्वाधिक म्हणजे १७.७८ टक्के एवढा आहे . यामुळे ५० वर्षांवरील आणि इतर अतिजोखमीचे आजार असणा-या व्यक्तीमध्ये कोरोना आजारामुळे गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असल्याचे अधोरेखित झाले आहे.

*राज्यातील जिल्हानिहाय रुग्ण : (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: ४४४७ (१७८)
ठाणे : ३५ (२)
ठाणे मनपा: २२० (४)
नवी मुंबई मनपा: १२५ (४)
वसई विरार मनपा: ११४ (३)
मालेगाव मनपा: ११६ (११)
पुणे मनपा: ८४८ (६३)
पिंपरी चिंचवड मनपा: ७० (२)
सोलापूर : ३८ (३)
औरंगाबाद मनपा : ४२ (५)
नागपूर मनपा : ९९ (१)

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था