विशेष प्रतिनिधी
कोलकाता : देशभर चीनी व्हायरस गुणाकार पद्धतीने फैलावत असताना ममता बँनर्जींच्या पश्चिम बंगालमध्ये मात्र त्याने हातपाय “आखडते” घेतलेले दिसताहेत. अर्थात ममता सरकारची आकडेवारीच तसे सांगते आहे. जगभरात कोरोनाग्रस्तांचा मृत्यूदर २.४% असताना शेजारच्या बांगलादेशात मात्र हा दर दुप्पट असल्याचा WHO चा अहवाल सांगतो. या पार्श्वभूमीवर ममतांनी कोरोनाच्या प्रादूर्भावाला “सरकारी आकडेवारीने अटकाव” करून टाकला आहे. इतर राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची आकडेवारी हजारांत आणि मृतांची आकडेवारी शेकड्यात असताना बंगालमधील कोरोनाग्रस्तांची हजारात तर मृतांची आकडेवारी डबल डिजीटमध्येच आहे. कोरोनाग्रस्तांच्या मृतांची कोलकता महापालिकेची आकडेवारी ममतांनी जाहीर केलेल्या आकडेवारीपेक्षा दुप्पट आहे. ममता मृतांचा आकडा ५ सांगतात तर कोलकाता महापालिका परिक्षेत्रातील सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमधील कोरोनाने मरण पावलेल्यांचा आकडा १० असल्याचे महापालिका सांगते आहे. महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सौमित्र घोष हे कोरोनाची वैद्यकीय माहिती सगळी सांगतात. पण आकडा विचारला की उपमहापौर अतिन घोष यांना विचारायला सांगतात. अतिन घोष हे देखील आकडेवारीबद्दल राज्य सरकारकडे बोट दाखवतात. अर्थात, यातून बंगालमधील कोरोनाग्रस्तांची संख्या काढली तर ती अचूक ठरण्याचा संभव फार कमी आहे. मूळात राज्यात आतापर्यंत फक्त १८०० जणांची कोरोना चाचणी झाल्याची नोंद आहे. शिवाय ममता सरकारने मरणाच्या कारणाच्या रिपोर्टिंगवरच “अंकूश” ठेवला आहे. राज्यातील मृत्यूंची नोंद कोरोनाखेरीज अन्य कारणांनी आणि विकारांनी झाल्याच्या नोंदी करण्यात येत आहेत. ह्रदय विकार, अन्य गंभीर विकार, आजार असणाऱ्यांना कोरोना लागण होऊन मृत्यू आला तरी त्याची नोंद कोरोना कॉलमात करण्यात येत नाही. राज्य सरकारने डेथ सर्टिफिकेटचा फॉर्ममध्ये मार्च आणि एप्रिल महिन्यात दोनदा बदल केले. यातील “मृत्यूचे कारण” कॉलममध्ये २४ विकारांचा समावेश करून फेरफार करण्यात आले. राज्य सरकारने “डेथ रिपोर्टिंगची” सिस्टिमच बदलली. एका डॉक्टरने दिलेल्या डेथ सर्टिफिकेटची छाननी पाच डॉक्टरच्या टीमकडून करण्यात येऊ लागली आहे.
केंद्र सरकारला राज्य सरकारने देण्याच्या अहवालाची आणि डेली रिपोर्टिंगची, ब्रिफिंगची व्यवस्थाही बदलण्यात आली. कोरोनाग्रस्तांचा समग्र आकडा देण्याची पद्धत बंद करण्यात आली. राज्याच्या आरोग्य सचिवांना केंद्रीय आरोग्य सचिवांना थेट मीहिती देण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. केंद्र सरकारकडे पोचविण्याची माहिती फक्त राज्याच्या मुख्य सचिवांमार्फत पोचविली जात आहे. यातील सर्वांत मोठी “मेख” म्हणजे बंगालचे आरोग्य खाते मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांच्याचकडे आहे. ममता बँनर्जी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन उचलत नाहीत. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा फोन घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या रोजच्या ब्रिफिंगमधील बंगालची आकडेवारी “गाळीव” अर्थात “फिल्टर्ड” असते. म्हणून तिच्या भोवतीचा संशय वाढला आहे. तबलिगी कार्यक्रमातून साधारण हजारभर लोक बंगालमध्ये पोचले. “ते सध्या काय करतात?” याचे कुठेही रिपोर्टिंग येताना दिसत नाहीत. बंगालमधील ७ पॉकेट्स कोरोना संवेदनशील म्हणून जाहीर केल्याचे ममतांनी स्पष्ट केले आहे. मात्र यात तबलिगींचा कुठेही उल्लेख आणि मागमूसही नाही…!!
A copy of a message circulated to WA group of senior bureaucrats in W Bengal…
बंगालमध्ये ममतांनी कोरोनाच्या फैलावाला “असा परिणामकारक” अटकाव केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App