धान्यवितरणाबाबत शरद पवारांच्या पाचपट तर भुजबळांच्या सहा पट बाता!


चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन केल्यामुळे नागरिकांना धान्यवाटप सुरू आहे. सरकारने तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी देण्याचा निर्णय घेतला. स्वस्त धान्य दुकानातून एकाच वेळी तीन महिन्यांच्या धान्याचे वितरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात किती धान्यवाटप करण्यात आले हे गौडबंगालच आहे. कारण याबाबत शरद पवार पाच पट तर त्यांचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सहा पट बाता मारत आहेत.


विशेष प्रतिनिधी

पुणे : चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन केल्यामुळे नागरिकांना धान्यवाटप सुरू आहे. सरकारने तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी देण्याचा निर्णय घेतला. स्वस्त धान्य दुकानातून एकाच वेळी तीन महिन्यांच्या धान्याचे वितरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात किती धान्यवाटप करण्यात आले हे गौडबंगालच आहे. कारण याबाबत शरद पवार पाच पट तर त्यांचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सहा पट बाता मारत आहेत.

गरजुंना अन्नधान वाटपाबाबत शरद पवारांनी त्यांच्या ‘पवारस्पिक्स’ या ट्विट हॅँडलरवरून ट्विट केले आहे. त्यामध्ये ते म्हणतात अन्नधान्याच्या संबंधी जी काळजी घ्यायची ते संबंधित मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे सहकारी योग्य प्रकारे घेत आहेत. आज पर्यंत पाच कोटी ९ लाख गरजूंना ३८ हजार क्विंटल धान्य वाटप झाले आहे. त्याचबरोबर ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही त्यांनाही योग्य ती मदत केली जात आहे.

मात्र, दुसर्या बाजुला छगन भुजबळ यांनी पंधरा दिवसांची आकडेवारी देताना शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकाला सांगितले की राज्यात ६ कोटी ८० लाख नागरिकांना ४४ लाखाहून अधिक क्विंटल धान्य वाटप झाले आहे.

परंतु प्रत्यक्षात महाराष्ट्र सरकारच्या माहिती विभागाच्या अधिकृत ट्विटरवरून राज्यातील स्वस्त धान्याचे सुरळित वितरण झाल्याचे म्हणत १ ते १५ एप्रिल दरम्यान १ कोटी ३५ लाख ५४ हजार शिधापत्रिकाधारकांना तब्बल ४३ लाख ६० हजार क्विंटल अन्न धान्याचे वायप केल्याी माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्याचे म्हटले आहे.

आता तीनही ठिकाणांहून माहिती इतकी मोठी तफावत आली कशी हा प्रश्न आहे. माहिती विभागाची माहिती खरी मानायची तर पवारांनी आणि भुजबळांनी पाच आणि सहा कोटीचा आकडे आणला कोठून हा प्रश्न उपस्थित होतो. माहितीतील ही तफावत भारतीय जनता पक्षाने पकडली आहे. शिधा वाटप दुकानदारांकडून एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांची चलने भरून घेण्यात येत आहेत. या चलनाच्या आधारावर तिप्पट अन्नधान्य वितरित करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पीओएस मशीनवर देखील १ एप्रिलपासून एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांचे अन्नधान्य एकाचवेळी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्न धान्य वितरण अधिकारी व उपनियंत्रक शिधा वाटप यांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. पण प्रत्यक्षातील परिस्थिती काय यामागचे गौडबंगाल या विसंगत माहितीमुळे समजेनासे झाले आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात