‘थ्री इडियट्स’मधल्या नव्हे ‘रिअल लाईफ’मधील रॅंचो सांगतात चीनी मालावर बहिष्कार घाला


‘थ्री इडियटस’ चित्रपटातील रॅंचो हे पात्र ज्यांच्यावरून बेतले ते मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचूक यांनी सोशल मीडियावरून चीनी मालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. वांगचूक हे लडाखचे रहिवासी असून या ठिकाणी शाळा चालवितात. चीनविरोधात भारतीयांनी केवळ बुलेट पॉवर नव्हे तर आपली वॉलेट पॉवरही वापरली पाहिजे, असे वांगचूक यांचे देशवासियांना आवाहन आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे : ‘थ्री इडियटस’ चित्रपटातील रॅंचो हे पात्र ज्यांच्यावरून बेतले ते मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचूक यांनी सोशल मीडियावरून चीनी मालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. वांगचूक हे लडाखचे रहिवासी असून या ठिकाणी शाळा चालवितात. आता केवळ बुलेट पॉवर नव्हे तर भारतीयांनी आपली वॉलेट पॉवरही चीन्यांविरुध्द वापरली पाहिजे, असे वांगचूक यांनी म्हटले आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडीओवर चीनच्या लडाखमधील चाललेल्या कुरापतींची माहिती दिली आहे. ते म्हणतात, मी लडाखमध्ये असून सिंधू नदी वाहताना पाहत आहे. या पर्वतांच्या पलीकडे नुब्रा आणि चांगतांग हे परिसर आहेत. या ठिकाणी तणाव वाढत आहे. हजारो सैनिक चीनने तेथे आणले आहेत. त्याचबरोबर चीनी विमानेही दिसत आहेत. अनेकदा सीमेवर तणाव होतो तेव्हा आपले लष्कर त्याचा मुकाबला करील असे वाटून नागरिक निवांत झोपतात. परंतु, माझे लोकांना सांगणे आहे की या वेळी केवळ सैनिकच नव्हे तर नागरिकांनीही उत्तर द्यायला हवे. दोन्ही बाजुंनी हे युध्द आपण लढायला हवे.

चीन केवळ भारताच्याच नव्हे तर व्हिएतनाम, तैवान, हॉंगकॉग यांच्याशी कुरापती काढत आहे. याचे कारण म्हणजे चीन आज आपल्याच नागरिकांना घाबरत आहे. १४० कोटी जनता वेठबिगाराप्रमाणे हुकूमशाहीच्या नाकाखाली काम करत आहे. ते जर जागे झाले तर क्रांती होऊ शकते. यालाच चीन घाबरत आहे. याच कारण म्हणजे चीनमधील कारखाने बंद आहेत. निर्यात बंद आहे. त्यामुळे बेरोजगारीचा दर २० टक्यांवर गेला आहे. लोक नाराज आहेत. क्रांती होऊन सत्तापालट होऊ शकतो.

त्यामुळेच चीन आपल्या शेजाऱ्यांशी शत्रुत्व ओढवून घेऊन जनतेमध्ये राष्ट्रवादाची भावना वाढवून आपल्या बाजुने करून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

वांगचूक म्हणतात, 1962 मध्ये जेव्हा चीनने भारताशी युध्द केले होते त्याचे कारणही जनतेमधील क्षोभ कमी करणे हेच होते. त्या वेळी चार वर्षांच्या दुष्काळामुळे भुकबळी जात होते. त्याच्यापासून लक्ष हटविण्यासाठी युध्द करण्यात आले. आता चीनला आपला जीडीपी वाढविणे गरजेचे वाटत आहे. त्यामुळेच भारताची वॉलेट पॉवर आपल्या बुलेट पॉवरपेक्षा जास्त महत्वाची आहे..

भारतीय लोक देशी उद्योगांना मरनासन्न करून चीनकडून मूर्तींपासून ते कपड्यांपर्यंत सगळी खरेदी करतात. तब्बल पाच लाख कोटी रुपयांचे सामान चीनकडून खरेदी केले जाते. हा पैसा  सीमेवर आपल्याच सैनिकांविरुध्द हत्यार बनविण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे आपल्या सैनिकांच्या मृत्यूला एका अर्थाने आपणच हातभार लावतो. त्यामुळे आपल्या देशातील 130 कोटी नागरिक आणि बाहेरच्या देशातील ३ कोटी भारतीयांनी संपूर्ण जगात ‘बायकॉट मेड इन चायना’ चळवळ सुरू करायला हवी.

इतक्या मोठ्या प्रमाणावर बायकॉट झाला तर चीनची अर्थव्यवस्था गडगडून जाईल. जनतेमध्ये रोष निर्माण होऊन त्याठिकाणी सत्तापालट होईल. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने हाच विचार केला पाहिजे आपण मोबाईलपासून ते कॉंप्युटर, कपडे, खेळणीपर्यंत प्रत्येक प्रकारच्या वस्तू खरेदी करून चीनी सैन्यालाच पैसे पाठवित आहोत, असेही वांगचूक यांनी म्हटले आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात