विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : निजामुद्दीन परिसरातील तबलिगी जमातच्या मरकजवर २८ मार्चला झालेली कारवाई हिमनगाचे टोकच होती कारण त्यावेळी फक्त १५०० च्या आसपास लोकांना तेथून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तबलिगी मस्तीखोरीची चौकशी जसजशी खोलात जाऊ लागली आहे, तसतसे त्यांचे वेगवेगळे कारनामे समोर येऊ लागले आहेत. तबलिगी जमातच्या मरकजमध्ये जानेवारीपासूनच लोकांची वर्दळ वाढू लागली होती. सुरवातीला हा आकडा काही शेकड्यांमध्ये वाटत होता पण प्रत्यक्षात जानेवारी ते २८ मार्च २०२० पर्यंत तब्बल ९००० लोक मरकजमध्ये आल्याचे समोर आले आहे. एएनआय न्यूज एजन्सीनेच हा आकडा दिल्याने त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होऊ शकत नाही. यातील परकीय नाकरिकांचा आकडा २००० असल्याचा आजचा आकडा आहे. महाराष्ट्रातून १०४५ लोक मरकज दौरा करून आल्याचाही आकडा एएनआयने दिला आहे. उरलेल्या राज्यांचा आकडाही असाच हजारांमध्ये आहे. याचा अर्थ तबलिगी जमातच्या “ऑक्टोपसने” जानेवारी ते मार्च २८ पर्यंत दिल्लीसह देशभर पाय पसरले होते आणि हे दिल्ली पोलिसांच्या नाकाखाली घडत होते, असे स्पष्ट होत आहे. तबलिगी जमातच्या लोकांचा प्रवास आणि कोरोनाचा फैलाव हे गेल्या दोन महिन्यांमध्ये देशात समांतर चालत असल्याचे हळूहळू स्पष्ट होते आहे. अजित डोवाल अँक्टीव मोडमध्ये आल्यावर मरकज दोन अडीच तासात खाली होणे आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यावर ९६० परकीय नागरिकांना काळ्या यादीत टाकून त्यांचे टूरिस्ट व्हिसा रद्द करणे, या वेगवान घडामोडी तबलिगी ऑक्टोपसची भयानकता स्पष्ट करतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App