तबलिगी ऑक्टोपसचा विळखा सुटेना; ६०० परदेशी तबलिगी दिल्लीतच मशिदींमध्ये लपलेले सापडले; आणखी किमान २०० जणांचा शोध सुरू


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : तबलिगी जमातच्या ऑक्टोपसने दिल्लीला घातलेला विळखा सुटायचे नाव घेत नाहीए. २८ मार्चला निजामुद्दीनच्या तबलिगी मरकजवर कारवाई करून सुमारे २४०० तबलिगींना बाहेर काढले पण त्यांची संख्या थांबायलाच तयार नाही. त्यानंतरच्या तीन दिवसांमध्ये दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्याच विविध मशिदींमध्ये लपलेल्या ६०० परदेशी तबलिगींना पकडले. हा आकडाही येथे संपत नाही. पोलिसांच्याच म्हणण्यानुसार अजून काही मशिदींमध्ये तपास करायचा बाकी आहे. तेथे किमान २०० परदेशी तबलिगी सापडतील. तबलिगी जमातीवर कारवाई सुरू होऊन सहा दिवस झाले. प्रत्येक वेळी वेगवेगळे आकडे समोर आले. ते अजूनही फुगतच आहेत. निजामुद्दीनच्या मरकजमधून जानेवारीपासून हजारोंच्या संख्येने तबलिगी बाहेरच्या राज्यांमध्ये गेल्याचे चौकशीत निष्पन्न झाले पण दिल्लीतील मशिदींमध्येच हजारो तबलिगी अजून लपले असल्याचे आज उघड झाले.

सुरवातीच्या चौकशीत १८७ परदेशी तबलिगींची यादी पोलिसांच्या हाती लागली. त्या सगळ्यांना पकडून पोलिसांनी क्वारंटाइन करून टाकले. नंतर मरकजमधून वेगवेगळ्या राज्यांमध्ये पोचलेल्या परदेशी आणि भारतीय तबलिगींची यादी मिळाली. त्यावर कारवाई देखील सुरू झाली. गृह मंत्रालयाने ६७० परदेशी तबलिगींचा व्हिसा रद्द केला. त्यांना काळ्या यादीत टाकले पण तबलिगींची संख्या काही आटोक्यात येईना. आणि आज पोलिसांना दिल्लीतच ६०० परदेशी तबलिगींचे “घबाड” मिळाले. ईशान्य दिल्लीच्या मशिदींमध्ये १००, अग्नेय दिल्लीच्या मशिदींमध्ये २००, दक्षिण दिल्लीच्या मशिदींमध्ये १७० तर पश्चिम दिल्लीच्या मशिदींमध्ये ७ परदेशी तबलिगी लपलेले सापडले. ही संख्या पाहून पोलिसही चक्रावून गेले आहेत. तबलिगींचे जाळे कोठे आणि कसे पसरले आहे, याचा वेगाने शोध सुरू आहे.

१ ते १८ मार्च दरम्यान २१०० परदेशी तबलिगी भारतात आले. ते मरकजमध्ये राहिले. त्यानंतर ८२४ परदेशी तबलिगी चिल्लासाठी मरकजमधून बाहेर पडले. २१६ परदेशी तबलिगी अद्याप निजामुद्दीनच्या मरकजमध्येच आहेत. उरलेले ९०० परदेशी तबलिगी दिल्लीच्या मशिदींमध्येच लपलेले आहेत. ते शोधून काढायचे आहेत, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. दिल्लीत चिनी व्हायरस कोविड १९ च्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३८७ आहे. त्यापैकी २५९ पॉझिटिव्ह रुग्ण एकट्या तबलिगी जमातच्या मरकजशी संबंधित आहेत.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात