भारताने चीनी व्हायरसशी चांगला मुकाबला केला होता. जगातील इतर देशांच्या तुलनेत चीनी व्हायरसच्या प्रादुर्भावाचे भारतातील प्रमाण कमी होते. मात्र, तबलिगी जमात मरकझच्या प्रकरणामुळे भारतात चार दिवसांत चीनी व्हायरसबाधित रुग्णांचे प्रमाण दुप्पट झाले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताने चीनी व्हायरसशी चांगला मुकाबला केला होता. जगातील इतर देशांच्या तुलनेत चीनी व्हायरसच्या प्रादुर्भावाचे भारतातील प्रमाण कमी होते. मात्र, तबलिगी जमात मरकझच्या प्रकरणामुळे भारतात चार दिवसांत चीनी व्हायरसबाधित रुग्णांचे प्रमाण दुप्पट झाले आहे.
भारतातील चीनी व्हायरसच्या रुग्णांची संख्या ३३७४ पर्यंत गेली आहे. देशातील २७४ जिल्ह्यांमध्ये चीनी व्हायरस पसरला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. रुग्णांची संख्या वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी मरकझ आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने परदेशी प्रवासी आले होते. लॉकडाऊनच्या काळातही तेथे धार्मिक कार्यक्रम सुरू होते.
गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार १३ हजारांवर तबलिगी तेथे जमा झाले होते. येथील तबलिगी कार्यकर्ते देशाच्या सर्व भागात गेले. सुरूवातीला केवळ शहरांपर्यंत मर्यादित असलेला चीनी व्हायरस त्यामुळे ग्रामीण भागातही पोहोचला. त्यामुळे सरकारच्या उपाययोजनांनाही मर्यादा आल्या. तबलिगी जमात मरकझच्या पूर्वी सात दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट होत होती. आत ती चार दिवसांत दुप्पट होत आहे.
अद्यापही या मरकझमध्ये सहभागी झालेल्या अनेकांचा ठावठिकाणा लागलेला नाही. काही जण पळून गेले आहेत. त्यामुले त्यांच्याकडून इतरांना लागण होण्याची भीती अद्याप कायम आहे. तबलिगी जमातचा हा कार्यक्रम झाला नसता तर रुग्ण दुप्पट होण्याचा वेग आणखी कमी झाला असता. ७ ते ८ दिवसांत एक रुग्ण समोर आला असता, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले. सध्या देशाच्या अनेक भागांत सापडलेल्या रुग्णांत तबलिगी जमातशी संबंधितांचे प्रमाण अधिक आहे.
देशात सध्या पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्वीपमेंट किटचा तुटवडा आहे. आपण हे आयात करत आहोत. जानेवारीपासूनच सरकारने यावर उपयायोजना सुरू केल्या आहेत. देशातील उत्पादकांनी य्किटचे उत्पादन सुरू केले आहे. ज्या कुठल्या देशांमध्ये हे किट उपलब्ध आहेत तिथून ते मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, अशी माहिती कअग्रवाल यांनी दिली. किटचा पुरवठा आहे संबंधित राज्यांमध्ये आढळून आलेल्या रुग्ण संख्येच्या आधारावर करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. गेल्या २४ तासांत ४७२ नवीन प्रकरणे आणि ११ मृत्यूची नोंद झाली आहे, तर २६७ लोक बरे झाले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App