विशेष प्रतिनिधी
मुंबई : “कोरोना संकटाच्या काळात राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये, यासाठी विधानपरिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारीजी यांनी निवडणूक आयोगाकडे शिफारस करण्याचा जो निर्णय घेतला, त्याचे आम्ही स्वागत करतो,” असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेवर निवडून जाण्याच्या मुद्यावरुन राजकीय वातावरण तापले आहे. राज्यपाल कायदेशीर भूमिका घेत असताना त्यांच्यावर टीका केली जात आहे.
कोरोना संकटाच्या काळात राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये, यासाठी विधानपरिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी मा. राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारीजी यांनी निवडणूक आयोगाकडे शिफारस करण्याचा जो निर्णय घेतला, त्याचे आम्ही स्वागत करतो.(1/3)#Maharashtra @BSKoshyari— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 30, 2020
कोरोना संकटाच्या काळात राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये, यासाठी विधानपरिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी मा. राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारीजी यांनी निवडणूक आयोगाकडे शिफारस करण्याचा जो निर्णय घेतला, त्याचे आम्ही स्वागत करतो.(1/3)#Maharashtra @BSKoshyari
या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले की, संविधानाच्या तत्वांचे पालन करीतच राज्यपालांनी हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोग या शिफारसीवर केंद्रीय गृहमंत्रालयाशी सल्लामसलत करून तत्काळ विधानपरिषदेच्या 9 जागांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय करेल, हा आम्हाला विश्वास वाटतो.
शिवाय, यामुळे राज्यपाल नियुक्त सदस्यांनी मंत्री किंवा मुख्यमंत्री होऊ नये, या संकेतांचे सुद्धा पालन होईल. मुख्यमंत्र्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. यातून एक बाब स्पष्ट झाली आहे की, लोकशाही प्रक्रियेत संवादातूनच मार्ग निघत असतो. संवैधानिक पदावर आसीन व्यक्तीवर अकारण टीका करून कोणताही फायदा होत नाही, असाही टोला फडणवीस यांनी लगावला.
Press Release pic.twitter.com/OaEMcXnKny— Governor of Maharashtra (@maha_governor) April 30, 2020
Press Release pic.twitter.com/OaEMcXnKny
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App