संपूर्ण देश चीनी व्हायरसच्या विरोधात लढतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून संपूर्ण मंत्रीमंडळ दररोज बैठका घेत आहेत. मात्र, कॉँग्रेसने मात्र राहूल गांधी यांच्या प्रतिमा संवर्धनाचा (इमेज बिल्डींग) साठी प्रयत्न सुरू झाला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संपूर्ण देश चीनी व्हायरसच्या विरोधात लढतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून संपूर्ण मंत्रीमंडळ दररोज बैठका घेत आहेत. मात्र, कॉँग्रेसने मात्र राहूल गांधी यांच्या प्रतिमा संवर्धनाचा (इमेज बिल्डींग) साठी प्रयत्न सुरू झाला आहे.
देशात चीनी व्हायरसचा उद्रेक झाल्यावर ‘जान है तो जहान है’ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केला. यामुळे देशातील आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. प्राण वाचविणे आणि चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव रोखणे हे पहिले उद्दिष्ट आहे. मात्र, राहूल गांधी मात्र अर्थव्यवस्थेवरून सरकारवर टीका करत आहेत.
राहुल गांधी गेल्या दोन महिन्यांपासून सतत अर्थव्यवस्थेबाबत सूचना देत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासूनच्या काळात राहूल गांधी यांची पोरकट अशीच प्रतिमा निर्माण झाली आहे. मात्र,या संकटाच्या काळात राहुल यांना जागतिक नेते म्हणून उभे करण्याची रणनीती कॉँग्रेसने आखली आहे. यासाठी राहूल गांधी यांनी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चेची मालिका सुरू केली आहे.
लॉकडाऊनच्या काळातच देशाच्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र,राहूल गांधी लॉकडाून संपल्यानंतर मोदी सरकारने आराखडा तयार करावा, असे सांगत आहेत. चीनी व्हायरसबाबत सुचना देण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी डॉ.मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षेखाली 11 सदस्यांची कमिटी स्थापन केली आहे, यामध्ये राहुल गांधी देखील आहेत.
रिझर्व्ह बॅँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याशी झालेल्या चचेर्नंतर या सत्राला सुरुवात झाली. राहुल यांनी राजनला विचारले की गरिबांच्या मदतीसाठी किती खर्च येईल? तर यासाठी 65 हजार कोटी रुपयांची गरज असल्याचे उत्तर राजन यांनी दिले. ते म्हणाले की ही रक्कम देशाच्या जीडीपीच्या तुलनेत काहीच नाही. गरिबांना वाचवण्यासाठी खर्च करायला हवी. भारत या संधीचा फायदा घेऊ शकतो. उद्योग आणि पुरवठा साखळीत विशेष स्थान मिळविण्याची संधी आहे. लॉकडाउन जास्त काळ सुरू राहणे शक्य नाही, असेही राजन यांनी सांगितले
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App