चीनमधील युनिट बंद करून लावा मोबाईल कंपनी भारतात येणार


  • भारतात ८०० कोटींची गुंतवणूक करणार

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चीनी व्हायरस कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर बड्या मल्टिनँशनल कंपन्या चीनमधून आपली उत्पादन युनिट बाहेर काढत आहेत. यात भारतीय मोबाईल कंपनी लावा हिचाही समावेश आहे.

लावा कंपनी आपले युनिट चीनबाहेर काढून भारतात आणणार आहे. यासाठी भारतात ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची कंपनीची तयारी आहे. लावा कंपनीकडूनच ही माहिती देण्यात आली.

सद्यस्थितीमध्ये ज्या वेगाने कोरोना वाढतो आहे आणि त्याचा उगम आणि प्रसार राक्षसी महत्त्वाकांक्षा असलेल्या चीनकडून झालेला असल्याने त्याच्यावर सगळ्यांचाच मोठा रोष आहे.

चीनमध्ये मोठी गुंतवणूक केलेल्या अनेक कंपन्या गाशा गुंडाळून चीनमधून निघण्याच्या बेतात आहेत. मोबाईल उत्पादन करणाऱ्या ‘लावा’ या कंपनीने आपला चीनमधील व्यवसाय गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. लावा इंटरनॅशनलकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. भारतात करण्यात आलेल्या धोरणात्मक बदलांनंतर कंपनीनं आपला व्यवसाय भारतात आणण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं मोबाईल फोन डेव्हलपमेंट आणि उत्पादन वाढीसाठी पुढील पाच वर्षात भारतात ८०० कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढील काळात अशा अनेक कंपन्या भारतात येऊन मोठी गुंतवणूक करतील असा अंदाज वर्तवला जातो आहे.

आपत्तीतही अनेक नव्या संधी दडलेल्या असू शकतात हे लक्षात घेऊन भारताने भारताने जगभरातील १००० कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

फायनॅन्शिअल एक्स्प्रेसने पीटीआयच्या हवाल्याने या बातमीला दुजोरा दिला आहे. चीनमध्ये व्यवसाय करत असलेल्या अमेरिकन कंपन्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. या कंपन्या ५५० पेक्षा अधिक उत्पादनांची निर्मिती करतात. सरकार प्रामुख्यानं वैद्यकीय वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या कंपन्या, फूड प्रोसेसिंग युनिट, टेक्सटाइल्स, लेदर आणि ऑटो पार्ट्स तयार करणाऱ्या कंपन्यांना या कंपन्यांना आकर्षित करण्याचे प्रयत्न करीत आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात