चीनची चालूगिरी उघड्यावर आली; वुहानमधली मृतांची आकडेवारी वाढली


विषेश  प्रतिनिधी
बिजींग : चीनी व्हायरस कोरोनामुळे वुहानमध्ये मरण पावलेल्यांच्या संख्येत “अचानक” ४०% वाढ झाल्याने चीनी कम्युनिस्ट सरकारची चालूगिरी उघड्यावर आली आहे. चीनच्या झिनूआ न्यूज एजन्सीनेच ही चालूगिरी उघड्यावर आणली.
एरवी चीनी कम्युनिस्ट सरकारच्या पोलादी पडद्याआडून कोणतीही खरी माहिती बाहेर पडणे अवघड असते. त्यातच कोरोना व्हायरसच्या फैलावाबाबत कम्युनिस्ट सरकारने मूळातच लपवाछपवी, उडवाउडवी, सारवासारवी, धच्चोटगिरी हे  सगळे प्रकार करून जगाला फसवले. पण पाण्यात घाण केली की कधीतरी वर येणारच तसेच चीनी कम्युनिस्ट सरकारचे झाले.
वुहानमधली मृतांची आकडेवारी कायद्यात दुरुस्ती करून त्यांना जाहीर करावी लागली. ती तब्बल ४०% जास्त भरल्याने चूक कुठे, कशी, का, कोणी केली, झाली याचा लांबलचक खुलासा करावा लागला. पण चीनच्या विश्वासार्हतेची जगभरात एवढी नाचक्की झाली आहे की नवा आकडा जाहीर करूनही जगाची शंका चीनी कम्युनिस्ट सरकारला दूर करता आलेली नाही.
वुहान शहरामधील लॉकडाऊन ७५ दिवसांनंतर उघडण्यात आले आहे.
झिनुआ न्यूज एजन्सीनुसार, वुहानमधील कोरोना संक्रमितांचा नवा आकडा ५० हजार ३३३ आहे, तर मृतांचा आकडा १२९० ने वाढून तो ३८६९ वर पोहोचला आहे. वुहानच्या शहर प्रशासनाच्या हवाल्याने हा आकडा देण्यात आला आहे. याची कारणेही देण्यात आली आहेत.
ती कारणे अशी : कोरोना महामारीच्या सुरवातीला सरकारी किंवा खासगी रुग्णालयांमध्ये उपचारांची सोयच नव्हती. तसेच अनेक ठिकाणी सोयी अपूर्ण होत्या. रोगाचे नेमके कारण समजत नव्हते. रोग समजेपर्यंत अनेकजण मरण पावले. त्यापैकी बरेच जण रुग्णालयांमध्ये आलेच नाहीत घरीच त्यांना मरण आले. त्यांची मोजदाद झाली नव्हती. ती सरकारी प्रोटोकॉलनुसार आणि मृतांच्या वैद्यकीय हिस्टरीनुसार मोजदाद आता करण्यात आली आहे.
  1.  सरकारी आणि खासगी रुग्णालयांमधील आकडा सातत्याने वाढत होता. उपचारांना प्राधान्य देण्यात येत होते पण अनेक ठिकाणी रुग्णालये ओवर फ्लो झाली. त्यातून मृतांच्या नोंदी, त्याची कारणे यांच्यात तफावत निर्माण झाली. परिणामी सुरवातीचे आकडे अचूक नोंदविता आले नाहीत.
  2.  वुहान आणि हुबेई प्रांतामधील सर्व रुग्णालये संपर्क यंत्रणेद्वारे अपडेट होण्यात वेळ गेला. डाटा नोंदी वेळेत होऊ शकल्या नाहीत. त्याचा परिणाम महामारीचे स्वरूप समजण्यास उशीर झाला.
  3. अनेक ठिकाणी मृतांच्या नोंदीमध्ये नावापासून कारणांपर्यंत बरीच तफावत आणि पुनरुक्ती होती. या सर्व चुका शोधून सुधारण्यात वेळ गेला.
  4. १६ एप्रिल पर्यंतची आकडेवारी आता सुधारिक आहे, असे सरकारी हवाल्याने झिनुआने स्पष्ट केले आहे.
    एवढा खुलासा करूनही जगभरात चीनी आकड्यावर अजूनही शंका उपस्थित केल्या जात आहेत. चीनने आकडेवारी लपविल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहेच.
Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात