कार्तिक कारंडे
नवी दिल्ली : चीनी व्हायरसच्या संकटाने देशाला वेढलेले असले तरी बहुतेक सगळेच पक्ष, नेते आपापल्या पद्धतीने जनतेला मदत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते आहे. भाजप तर सत्ताधारी पक्ष असल्याने त्यांच्यावर अधिक जबाबदारी. ८ एप्रिलपर्यंत गोळा केलेल्या माहितीनुसार, भाजप ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे. भाजपचे तब्बल १९ लाख कार्यकर्ते मदत कार्यात सहभागी असून त्यांनी आतापर्यंत ५ कोटींहून अधिक फूड पॅकेटचे वितरण गरीब, गरजूंना केले आहे. यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी ठेवलेले पाच कोटी फूड पॅकेटचे लक्ष्य भाजप कार्यकर्त्यांनी साध्य केले आहे.
केंद्रीय कार्यालयातील विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, ही आकडेवारी समोर आली आहे. दररोज सायंकाळी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे राष्ट्रीय पदाधिकारयांची आढावा बैठक घेत असतात. त्यांनी प्रत्येक पदाधिकारयाला एकेका राज्यातील मदत कार्याच्या समन्वयाची जबाबदारी दिली आहे. त्याचसोबत केंद्र सरकारनेही प्रत्येक मंत्र्यांकडे एकेका राज्याची जबाबदारी सोपविली आहे. संबंधित राज्यांचे पक्ष व मंत्री समन्वयकांचा दररोजचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला जातो. ८ एप्रिलपर्यंत गोळा केलेल्या माहितीतून भाजपचे अजस्त्र कार्यकर्ते करीत असलेल्या सेवा कार्याचे चित्र ठळकपणे समोर येत आहे. मोदी व नड्डा यांना दिलेल्या अहवालात पुढील माहिती दिली गेली आहे…
महाराष्ट्र भाजपही आघाडीवर…
महाराष्ट्रातही भाजपने सेवा कार्यात स्वतःला झोकून दिले आहे. ४२ हजार कार्यकर्त्यांनी आतापर्यंत ४३ लाखांपर्यंत फूड पॅकेटस पोहोचविली आहेत, ५६० सामुदायिक स्वयंपाकगृहे सुरू केली आहेत, ३ लाख कुटुंबापर्यंत थेट शेतकरयांमार्फत भाज्या व फळे पोहोचविण्याची व्यवस्था केली आहे, पाच हजार जणांनी रक्तदान केले आहे, तर २२ हजार रक्तदात्यांची सूची बनविली आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून पाच हजार गावांमध्ये सॅनिटायझेशन झाले आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश भाजपने दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App