औरंगाबादजवळ मालगाडीखाली चिरडून १६ मजूर ठार


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : जिल्ह्यातील सटाणा भागात रेल्वे रूळावर झोपलेल्या मजूरांवरून मालगाडी धडधडत गेली त्यात १६ मजूरांचा चिरडून मृत्यू झाला. पहाटे ५ – ५.१५ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. केंद्र आणि राज्य सरकाराने या अपघाताची दखल घेऊन मजूरांच्या कुटुंबीयांना सर्व मदतीचे आश्वासन दिले आहे.

या अपघाताच्या निमित्ताने कोरोना बरोबरच स्थलांतराची भीषणताही समोर आली आहे. हे सर्व मजूर जालन्यातील एका स्टील कंपनीत कामाला होते. लॉकडाऊन काळात कंपनी बंद झाल्याने हे मजूर मध्य प्रदेशात घरी निघाले होते. पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते सर्वजण रेल्वे रूळाच्या मार्गाने निघाले होते. भुसावळ येथून मध्य प्रदेशला जाणारी रेल्वे सुटणार असल्याची माहिती या मजूरांना मिळाली होती. म्हणून जालन्यातून ते चालत भुसाळवच्या दिशेने निघाले होते. रात्री चालून दमल्यामुळे सर्वजण रूळावरच झोपले होते. पहाटेच्या सुमारास मालगाडी त्यांच्यावरून धडधडत गेली तिच्याखाली चिरडून या मजूरांचा मृत्यू झाला.

सर्व म्हणजे १९ मजूर जालन्यातील एसजेआर स्टील कंपनीत कामाला होते. भुसावळमधून मध्य प्रदेशला जाणारी रेल्वे सुटणार असल्याची माहिती या मजूरांना मिळाली होती. म्हणून ते भुसावळच्या दिशेने निघाले होते.

मध्य प्रदेश सरकारने मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. हे सर्व मजूर शहडोल आणि उमरिया गावांचे रहिवासी असल्याचे समजते.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात