सिल्वर ओकच्या नादी लागलेल्या प्रत्येक नेत्याला आणि पक्षाला लाँगटर्म मध्ये नुकसानच सोसावे लागले आहे. काँग्रेस, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस ही नजीकच्या इतिहासातील उदाहरणे आहेत. उद्धव ठाकरे हे सिल्वर ओकचे ताजे “सावज” आहे.
विनय झोडगे
नुकसान आणि प्रतिमाहानीच्या चक्रात उद्धव ठाकरे अडकलेत असे वाटायला लागले आहे. कोणत्याही मर्यादित यश मिळू शकणाऱ्या नेत्याला यातून जावेच लागते का, असे वाटण्यास वाव आहे. त्यातही वैशिष्ट्य म्हणजे ते सुनील गावस्करांचे गाणे आहे, ना हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा चुकला तो संपला…!!
इथे हे गाणे वेगळ्या संदर्भात चपखल बसते. जो सिल्वर ओकच्या नादी लागला तो संपला असे म्हणता येणार नाही… पण घटत नक्की गेला. म्हणजे कमी होत गेला, असे नक्की म्हणता येईल… फार जुनी नाही पण गेल्या पाचच वर्षातली उदाहरणे पाहा ना… ती अगदी गणिती सूत्र रूपानेही मांडता येतील. काँग्रेसने सिल्वर ओकशी आघाडी केली. जो पक्ष आघाडीत नंबर १ ला होता, तो २ नंबरवर आला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधले अंतर १० आमदारांनी वाढले.
राज ठाकरे सिल्वर ओकचा सल्ला घ्यायला गेले. विधानसभेतील आकडा १३ वरून शून्यावर आणि मग १ वर अाला. देवेंद्र फडणवीस सिल्वर ओकमधील बंडखोराच्या नादी लागले. मुख्यमंत्रीपदाची दुसऱ्या कारकिर्दीवर साडेतीन दिवसांचा शिक्का घेऊन बसले. आता नंबर उद्धव ठाकरेंचा आहे…!! कोणत्या निकषावर सिल्वर ओक शिवसेनेला वाढू देईल? उलट शिवसेनेची political space जेवढी कमी करता येईल तेवढी भाजप नव्हे, सिल्वर ओकच ती कमी करेल कारण त्यातूनच सिल्वर ओकला स्वत:ची political space वाढवायला जागा आहे.
याचा अर्थ असा नाही की उद्धव ठाकरे यांना भाजप बरोबरची युती फार लाभदायक ठरली असती. अजिबात नाही. कदाचित मुख्यमंत्रीपद मिळाले असते… कदाचित नसतेही. पण शिवसेनेचे लाँगटर्म नुकसान टळले असते. मुख्य म्हणजे प्रतिमाहानी टळली असती. बाळासाहेबांनी अथक मेहनतीने महाराष्ट्राच्या अजेंड्यावर केंद्रस्थानी आणलेल्या हिंदुत्व संकल्पनेला वळसा घालून शिवसेनेला तथाकथित धर्मनिरपेक्षतेच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागले नसते.
पालघर सेक्युलर लिंचिंगच्या निमित्ताने आजच्या तीन तिघाडी सरकारमध्ये जे घडतेय ना… करणार पवार; भरणार ठाकरे हे टळले असते…!! मुख्यमंत्रीपद तर मिळाले पण आमदारकीसाठी ७ लोककल्याण मार्गाला फोन करायला लागतोय, हे तरी टळले असते. शिवसेनेची मूळं घट्ट ठेवून पुढे त्या झाडाला बहार आणता आली असती. अर्थात हे खरेच आहे की सिल्वर ओक काय किंवा भाजप काय दोन्ही पक्ष शिवसेनेला टार्गेट करणार हे उघड आहे… पण यात सिल्वर ओकच्या बरोबर जाऊन नुकसान अधिक आहे. भाजप बरोबर गेल्यास नुकसान कमी आहे. निदान प्रतिमाहानी नाही. ही वस्तूस्थिती नाकारण्यात मतलब नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App