अनलॉक होतानाच महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा भडका


  • सेस वाढविल्याने दोन्ही २ रुपयांनी महागणार
  • सामान्यांना दिलासा देण्याऐवजी उद्धव – पवार सरकारचा तडाखा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोना लॉकडाऊन अनलॉक होत असतानाच सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्याएेवजी राज्य सरकारने पेट्रोल – डिझेलवरील सेस वाढविण्याचा निर्णय घेतल्याने सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळण्याएेवजी तडाखा बसला आहे.

कोरोनामुळे निर्माण झालेली लॉकडाऊनमुळे तळाला गेलेली अर्थव्यवस्था अशा स्थितीत राज्यावर प्रचंड आर्थिक ताण पडला आहे. ही परिस्थिती असल्याने सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरचा सेस वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे राज्यात पेट्रोल आणि डिझेल 2 रुपयांनी महागणार आहे.

1 जूनपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. लॉकडाऊनमुळे सगळे व्यवहार बंद असल्याने सरकारच्या तिजोरीत येणारा पैसा जवळपास बंदच झाला असून आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड खर्च वाढला आहे. त्यामुळे पैशाचं गणित कसं जुळवायचं याची चिंता सरकारला पडली आहे. हा टॅक्स वाढल्यामुळे महागाईसुद्धा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यात आणि सर्व देशातच मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. चार वेळा लॉकडाऊन वाढवल्यावर आता पाचव्यांदा लॉकडाऊन वाढला. पण काही प्रमाणात अनलॉक होतय. लॉकडाऊनमुळे सगळे मोठे आणि लहान उद्योग बंद आहेत. आता सरकारने काही उद्योगांना परवानगी दिली आहे. मात्र अनेक उद्योगांना मजुरांचा प्रश्न भेडसावत आहे.

लॉकडाऊनमुळे राज्यातून लाखो मजुरांनी आपापल्या राज्यांमध्ये स्थलांतर केलं आहे. कोरोना व्हायरसची भीती लोकांच्या मनात असल्याने अजुनही व्यवहार पाहिजे तसे सुरू झालेले नाहीत. त्यातच आरोग्य व्यवस्थेवरचा सरकारचा खर्च वाढत आहे. या परिस्थितीमुळे सगळ्या योजनांना कात्री लागली आहे. फक्त अत्यावश्यक प्रकल्पच संथपणे पुढे जात आहेत. सगळ्या योजनांचा पैसा हा फक्त कोरोनाविरुद्ध वापरला जात असल्याने सरकारवर ताण पडतो आहे.

कर्मचाऱ्यांचे पगार, प्रशासन चालविण्यासाठीचा दररोजचा खर्च अशा सगळ्या कामांसाठी लागणारा पैसा जमा करणं हे सरकारसमोरचं आव्हान असून पैशाचं चक्र पुन्हा सुरू करायचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात