कंपनी विकून ४० हजार लोकांना स्वच्छ पाणी मिळवून देणारी महिला, कधीकाळी टँकरची वाट पाहणाऱ्या गावाची आता भागतेय तहान!


सध्या नवरात्र सुरू आहे. समाजात नि:स्वार्थीपणे काम करणाऱ्या अनेक दुर्गा आपल्या आजूबाजूलाच असतात. कुठलाही गाजावाजा न करता त्या शांतपणे आपले काम करत असतात. अशाच दुर्लक्षित दुर्गांची ओळख आम्ही या मालिकेतून करून देत आहोत. जयश्री राव यांनी गावाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी केले कार्य वाखाणण्याजोगे आहे. त्यांचीच घेतलेली ही दखल… She is helping people to get clean drinking water by selling her own company


विशेष प्रतिनिधी

पाचगणी :  जयश्री राव यांनी स्वतःची कंपनी विकून ग्राम परी नावाची NGO स्थापन केली. महाराष्ट्रातील २०० खेड्यातील १.२ लाख लोकांना याचा लाभ मिळाला आहे. भारतातील पाण्याची पातळी बऱ्याच ठिकाणी वातावरणातील बदल, शहरीकरण आणि जमीनीच्या वापरातील बदल यामुळे घटत आहे. पांचगणी मधील (महाराष्ट्र) अखेगनी या गावातील लोकांना उन्हाळ्यात टॅंकरवर अवलंबून राहावे लागत असे. पण त्यांना आता पुरेसे पाणी मिळत आहे. या प्रदेशातील ६० गावेपण मैलोनमैल चालून पाणी आणण्याच्या त्रासातून मुक्त झाली आहेत.

ग्रामपरी NGO ने या बदलासाठी त्यांना सहाय्य केले.

जयश्री राव म्हणाल्या “१९६७ साली बेंगलोर मधील महिलेने त्यावेळी फक्त अठरा वर्षाची असताना ग्रामपरी स्थापन केली. पांचगणी मधील IOC initiative of change या asia plateau MRA सेंटर चे NGO मधे मी सामील झाले.”

त्यांनी पदवीचे शिक्षण सोडून ग्रामीण समाजाच्या मदतीसाठी काम चालू केले. १९७६ मधे लग्न करून इंग्लंडला गेल्याने काम थांबले. १९८२ मध्ये बेंगलोर येथे कंपनी चालु केली. २००६ मध्ये एका व्यवहारातून १लाख फायदा झाला. त्या दिवशी घरी जाताना त्यांनी एका भाजीवाल्याबरोबर पाच रुपयांसाठी घासाघीस केली. पण नंतर त्यांच्या मनाला हे लागले की १ लाख मिळवूनही आपण एका छोट्या विक्रेत्याला पाच रुपये दिले नाहीत. ज्याचे त्याला महत्त्व जास्त होते. आता त्यांनी सामाजिक कार्य करायचे असे ठरवले.

२००७ मध्ये कंपनी विकून पांचगणीत ग्रामपरी स्थापन केली. सरकार ग्रामीण भागात १९ अधिकारी निरनिराळ्या योजना राबविण्यासाठी करते. पण अंमलबजावणी करणे आवश्यक असते. मी बिहारमधील एका सरपंचांची माहिती वाचली होती की त्यानी आदर्श गाव केले आहे. याचप्रमाणे गावातील लोकांना एकत्र करून काम चालू केले पण ते यशस्वी झाले नाही. कारण त्यातून त्यांना आर्थिक लाभ नव्हता. मग मातीचे दिवे त्यांच्याकडून घेऊन विकणं सुरू केले.


बालकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी केंद्राने संसदेने मंजूर केले बाल न्याय सुधारणा विधेयक


याच काळात लोकांनी त्यांना पाणी प्रश्न सांगितला व पाणी कमी तसेच प्रदुषित असते असे सांगितले. IOC मधील अमेरिकन Jared Buono यांनी पाणी स्वच्छ करणे प्रदुषण कमी करण्यासाठी उपाय सांगितला व कॉन्क्रिट टाक्या बनवल्या.अखीगेनी मध्ये पहिला प्रोजेक्ट झाला. लोकांचे आरोग्य सुधारल्याने इतर गावांतून मागणी आली. आता  ४०००० लोक या योजनेचा लाभ घेत आहेत.

पाण्यामुळे लोकांमधे भांडणे होतात. आम्ही लोकांना अट घातली की हे काम श्रमदानातून करायचे आहे.आता पंचायत संस्थाना सॅनिटेशन, आरोग्य, ऑरगॅनिक शेती, तंटा मुक्ती याबाबत शिक्षण देतो. १६२ शाळांमधील मुलांना हात धुण्याची सवय लागण्यासाठी काम केले.

अशा वेगवेगळ्या कामांतून २०० गावातील लोकांना फायदा झाला. एका ग्रामीण महिलेने सांगितले की, आमची आर्थिक परिस्थिती या संस्थेमुळे सुधारली. अशा अनेक महिला ज्या घराबाहेर पण पडल्या नव्हत्या त्या आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी झाल्या.

जयश्री म्हणाल्या की, गावातील लोकांना लगेच बदल हवा असतो. ते काम करायला तयार नसतात. पण मी चिकाटीने काम करणे शिकले. सध्या त्यांची मुलगी अर्चना तसेच प्रथमेश मुरकुटे व दिपक जाधव संस्था चालवण्यासाठी मदत करतात. नवीन पिढी म्हणते की, आम्ही आमचे काम पश्चिम घाटातील झरे वाचवणे आणि खेड्यांमधून धोरणात्मक योजनांची अंमलबजावणी यावर केंद्रित करणार आहोत.

She is helping people to get clean drinking water by selling her own company

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”