सर्वपक्षीय बैठकीत बोलू दिले नसल्याचा आपचा आरोप; ३१ पक्षांचे ४२ नेते बोलले; केंद्र सरकारचे प्रत्युत्तर!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : संसदेचे उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत आपल्याला बोलू दिले नसल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी केला आहे. परंतु सर्वपक्षीय बैठकीत 31 राजकीय पक्षांचे 42 नेते बोलले. चर्चा सकारात्मक झाली, असे प्रत्युत्तर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिले आहे. Your allegation that you were not allowed to speak in the all-party meeting; 42 leaders from 31 parties spoke; Central Government’s reply !!

सर्वपक्षीय बैठक ही सर्व खासदारांनी आपापले प्रश्न उपस्थित करण्यासाठी असते. परंतु माझ्यासारख्या खासदाराला तिचे बोलू दिले जात नाही. मी शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. सीमा सुरक्षा दलाच्या कार्य कक्षेचा मुद्दाही उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. परंतु सरकारी पक्षाने मला बोलू दिले नाही, असा आरोप खासदार संजय सिंग यांनी केला.



याबाबत संसदीय कामकाज मंत्री प्रणव जोशी यांना विचारले असता ते म्हणाले, की सर्वपक्षीय बैठकीत 31 राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सामील झाले होते. 42 नेते आजच्या बैठकीत बोलणे कृषी कायद्यांपासून महागाईपर्यंत सर्व मुद्दे सर्वपक्षीय सदस्यांनी उपस्थित केले. सकारात्मक चर्चा झाली. कोणत्याही पक्षाच्या सदस्यांनी कोणतेही प्रश्न उपस्थित केले तर त्यावर संसदेच्या सदस्यांमध्ये चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. मात्र तिथे गोंधळ आणि गदारोळ होऊ नये, अशी अपेक्षा आहे.

सरकारी पक्ष कोणत्या खासदाराला बोलू देत नाही हा आक्षेपच चुकीचा आहे कारण आजच्या सर्वपक्षीय बैठकीत 31 राजकीय पक्षांचे 42 नेते सहभागी झाले आणि बोलले आहेत, असे प्रत्युत्तर प्रल्हाद जोशी यांनी दिले आहे.

Your allegation that you were not allowed to speak in the all-party meeting; 42 leaders from 31 parties spoke; Central Government’s reply !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात