तुम्हीही सत्तेच्या नशेत बुडालात, हे शोभत नाही!!; अण्णांचा केजरीवालांना टोला


प्रतिनिधी

मुंबई : दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारच्या दारू धोरणावर देशात सगळीकडून टीकेची झोड उठलेली असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील केजरीवाल यांच्यावर शरसंधान साधले आहे. You are also drunk with power, it is not proper anna hazare

अण्णा हजारे यांनी दिल्ली सरकारच्या नवीन दारू धोरणाबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खरमरीत पत्र लिहिले असून या पत्रात अण्णांनी केजरीवालांना, तुम्हीही सत्तेच्या नशेत बुडाला आहात. मोठ्या चळवळीतून जन्माला आलेल्या पक्षाला ते शोभत नाही, अशा परखड शब्दांत फटकारले आहे.

या पत्रात अण्णा म्हणतात :

“स्वराज” या पुस्तकात तुम्ही किती आदर्श गोष्टी लिहिल्या होत्या. तुमच्याकडून खूप आशा होत्या, पण राजकारणात आल्यावर आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही आदर्श विचारसरणीला विसरलात. दारू जशी नशा आहे तशीच सत्तेची नशा आहे. तुम्हीही अशा शक्तीच्या नशेत आहात, असे वाटते.

महाराष्ट्रासारखे दारू धोरण दिल्लीतही होईल, अशी अपेक्षा होती, मात्र तुम्ही तसे केले नाहीत. सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता यात जनता अडकली आहे. मोठ्या चळवळीतून जन्माला आलेल्या पक्षाशी हे सुसंगत नाही.

राजकारणात गेल्यावर आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर आदर्श विचारसरणीचा विसर पडल्याचे दिसत आहे. दिल्लीत तुमच्या सरकारने असे नवीन दारू धोरण बनवले आहे, ज्यामुळे दारू विक्री आणि पिण्यास प्रोत्साहन मिळेल.

You are also drunk with power, it is not proper anna hazare

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!