विशेष प्रतिनिधी
लखनऊ : देशात कोरोनाच्या काळात सर्वात धडाडीने काम ऊत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारने केले. ऑक्सिजन कमतरतेवर यशस्वी मात केली. चक्क विमानाने दोन मोठे टँकर भरून ऑक्सिजन आणला असे कौतुक कानपुर आयआयटीने केले आहे.Yogi Government’s most courageous work during Corona’s era, successful overcoming oxygen shortage, praised by Kanpur IIT
कोरोनाचा काळ संपूर्ण जगासाठी अत्यंत कष्टदायक ठरला. भारतात अनेक ठिकाणी स्थिती नियंत्रणाबाहेर गेली. मात्र, त्या स्थितीतही उत्तर प्रदेश सरकारने कोरोना नियंत्रणासाठी ज्या धडाडीने काम केले, असे आयआयटी कानपूरच्या तज्ज्ञांनी म्हटले आहे.
आयआयटी कानपूरचे प्रा. मणिंद्र अग‘वाल आणि त्यांच्या चमूने यासंदर्भातील सखोल अभ्यास केला. त्यांनी अभ्यासांती काढलेल्या निष्कर्षाचा अहवाल नुकताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सोपविण्यात आला. योगी आदित्यनाथ सरकारने कोरोनाच्या पहिल्या लाटेत स्थिती नियंत्रणात ठेवलीच होती. दुसरी लाट संपूर्ण देशासाठीच महाभयंकर होती.
त्यावेळी योगी सरकारने एकाचवेळी उपचार, बाधितांची सं‘या नियंत्रित ठेवण्याचे उपाय, स्थलांतरित कामगारांचे योग्य नियोजन, रोजगार अशा सर्वच आघाड्यांवर अतिशय योजनाबद्धरितीने काम केले. देशातील अनेक राज्ये कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान प्राणवायूच्या कमतरतेशी झुंजत असताना उत्तरप्रदेश हे एकमेव राज्य होते ज्यांनी हवाईदलाच्या मदतीने प्राणवायूचशे सिलेंडरचे दोन मोठे टँकर विशेष विमानाद्वारे मागवून बाधितांचे प्राण वाचविले.
कोरोना काळात राज्यात बाधितांसाठी बससेवा तसेच रुग्णवाहिका सेवा मोफत दिली जात होती.कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच स्थलांतरित कामगारांची समस्या संपूर्ण देशालाच भेडसावित होती, पण त्याही बाबतीत उत्तरप्रदेश सरकारने योग्य ते नियोजन केले.
स्थलांतरित कामगारांच्या राहण्याची, खाण्याची तात्पुरती सोय करण्यात आली. नंतर त्यांना रोजगारही पुरविण्यात आला. या संपूर्ण काळात राज्यात वैद्यकीय सुविधा अद्ययावत होत्या आणि बाधितांना सरकारी रुग्णालयात या सर्व सेवा मोफत देण्यात आल्या. कोणालाही भरमसाट बिल भरण्याची वेळ आली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App