विशेष प्रतिनिधी
लखनौ: प्रार्थना करण्याचा अधिकार सर्वांना आहे मात्र त्यामुळे दुसऱ्यांना त्रास होऊ नये असा सज्जड दम देत योगी आदित्यनाथांनी भोंग्याविरुध्दची कारवाई करून दाखविली आहे. गेल्या चार दिवसांत उत्तर प्रदेशात ११ हजारांवर भोंगे काढून टाकण्यात आले आहेत. ३५ हजार भोंग्यांचा आवाज परवानगीयोग्य असलेल्या पातळीवर आणण्यात आला आहे. राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांना 30 एप्रिलपर्यंत यूपी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे पालन करण्याचे आदेश दिल्यानंतर ही कारवाई झाली.Yogi Adityanath did it, removed 11,000 loudspeakers in Uttar Pradesh, 35,000 reduced noise
वरिष्ठ अधिकाºयांसोबत कायदा आणि सुव्यवस्थेच्या आढावा बैठकीदरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, प्रत्येकाला त्यांच्या उपासनेच्या पद्धतीचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु लोकांनी असे केल्याने इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. भोंगा वापरता येत असला, तरी आवाज बाहेर जात नाही याची खात्री करा. इतर लोकांना कोणतीही अडचण येऊ नये.
योगींच्या या आवाहनाला सगळ्यांची पाठिंबा दिला. अनेक जिल्ह्यांतील हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायांच्या धार्मिक नेत्यांनी लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यास एकमताने सहमती दर्शवली आहे. 20 एप्रिल रोजी मथुरा येथील श्री कृष्णजन्मभूमी मंदिराने सगळ्यात पहिल्यांदा आपला भोंगा हटविला. मंदिर ट्रस्टने श्रीकृष्ण जन्मभूमीवरील भागवत भवनातील लाऊडस्पीकरवर दररोज पहाटे 5 वाजल्यापासून एक तासासाठी होणारी ‘मंगलाचरण आरती’ प्रसारित न करण्याचा निर्णय घेतला.
धार्मिक ठिकाणांवरील लाऊडस्पीकर काढून टाकण्यासाठी आणि त्यांचा आवाज परवानगी असलेल्या मर्यादेत सेट करण्यासाठी राज्यव्यापी मोहीम हाती घेण्यात आली आहे. बलरामपूरमधील शक्तीपीठ देवीपतन तुळशीपूर मंदिराने चारपैकी तीन लाऊडस्पीकर काढून टाकले. मंदिराचे महंत मिथिलेश नाथ यांनी सर्व धर्मगुरूंना त्याचे पालन करण्याचे आवाहन केले.
गोरखपूरमध्ये गोरखनाथ मंदिर ट्रस्टने आवारातील लाऊडस्पीकरचा आवाज कमी केला. याशिवाय मंदिराजवळील रस्ते, परिसर आणि सार्वजनिक ठिकाणांवरून लाऊडस्पीकर फिरवण्यात आले आहेत. मेरठमध्ये राजराजेश्वरी मंदिरात लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यात आला. मेरठमधील ऐतिहासिक काली पलटन मंदिराच्या व्यवस्थापनानेही असेच केले जाईल असे सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App