योगी आदित्यनाथ बाहेर पडले आणि कोरोना रुग्णांची संख्या झाली कमी, उत्तर प्रदेशातील ५५ जिल्ह्यांत नवे रुग्ण एक आकडी संख्येत


राज्याच्या प्रमुखाने गावपातळीपर्यंत पोहोचून काम केल्यावर काय चमत्कार होऊ शकतो हे उत्तर प्रदेशात दिसून आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हावार दौरे करून यंत्रणा कार्यरत केली. त्यामुळे उत्तर प्रदेशातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षणियरित्या कमी झाली आहे. ५५ जिल्ह्यांत तर नव्या रुग्णांची संख्या दहापेक्षा कमी झाली आहे. Yogi Adityanath came out and the number of corona patients decreased, with a new number of new patients in 55 districts of Uttar Pradesh

 


 

विशेष प्रतिनिधी

लखनऊ : राज्याच्या प्रमुखाने गावपातळीपर्यंत पोहोचून काम केल्यावर काय चमत्कार होऊ शकतो हे उत्तर प्रदेशात दिसून आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हावार दौरे करून यंत्रणा कार्यरत केली. त्यामुळे उत्तर प्रदेशातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षणियरित्या कमी झाली आहे. ५५ जिल्ह्यांत तर नव्या रुग्णांची संख्या दहापेक्षा कमी झाली आहे.

देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेशातील कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली जात होती. परंतु, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राबविलेल्या उपाययोजना आणि जिल्हावार दौरे करून यंत्रणा हलविल्याने कोरोनावर मात करण्यास उत्तर प्रदेशाला यश मिळाले आहे. एप्रिल महिन्यात उत्तर प्रदेशात सक्रीय रुग्णांची संख्या तीन लाखांवर गेली होती. परंतु, योगी आदित्यनाथ सरकारने युध्दपातळीवर प्रयत्न केले. ग्रामीण भागात कोरोना चाचण्या वाढविल्या.

ऑक्सिजनचा तुटवडा कमी केला. रुग्णालयांतील बेडची संख्या वाढविली. त्यामुळे आता सक्रीय रुग्णांची संख्या ७५ हजारांपर्यंत खाली आहे. उत्तर प्रदेशातील एक तृतियांश जिल्ह्यात कोरोना जवळपास संपला आहे. कोशम्बी जिल्ह्यात कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडला नाही. उत्तर प्रदेशातील ७५ जिल्ह्यांपैकी ११ जिल्ह्यांत नव्या कोरोना रुग्णांची संख्या एक आकडी म्हणजे दहापेक्षा कमी आहे. ५५ जिल्ह्यांत नव्या रुग्णांची संख्या दहापर्यंत आहे. यातील १८ जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या शून्य आहे.



कानपुर नगर, प्रयागराज, गौतमबुद्धनगर, बरेली, मुरादाबाद, झाँसी, आगरा, लखीमपुर खीरी, बलिया, अलीगढ़, गाजीपुर, गाजीपुर, मथुरा, शाहजहांपुर, देवरिया, बाराबंकी, आजमगढ़, अयोध्या, सोनभद्र, रायबरेली, अमरोहा, चन्दौली, प्रतापगढ़, कुशीनगर, बदायूं, सुलतानपुर, उन्नाव, बिजनौर, इटावा, हरदोई, ललितपुर, शामली, सीतापुर, महाराजगंज, हापुड़, गोण्डा, रामरपुर, बस्ती, बहराइच, पीलीभीत, फरुर्खाबाद, एटा, मैनपुरी, अमेठी, संभल, कन्नौज, सिद्धार्थनगर, बागपत, फिरोजाबाद,संतकबीर नगर, मऊ, भदोही, बलरामपुर, अम्बेडकरनगर, श्रावस्ती तथा कासगंज या जिल्ह्यांत नव्या कोरोना रुग्णांची संख्या दहापेक्षा कमी आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गेल्या महिनाभरापासून राज्यात जिल्हावार दौरे करत आहेत. प्रत्येक ठिकाणी जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयांत बैठका घेत आहेत. काही लाख कर्मचाऱ्यांची पथके तयार केली आहेत. गावोगावी जाऊन या पथकांकडून तपासणी होत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या रोखण्यात राज्याला यश आले आहे.

Yogi Adityanath came out and the number of corona patients decreased, with a new number of new patients in 55 districts of Uttar Pradesh

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात