विशेष प्रतिनिधी
भोपाळ : मध्य प्रदेशातील शिवराज सरकार मधील ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर राज्याच्या विविध विभागांना भेटी देत आहेत. त्यांनी ग्वाल्हेरमधील हजीराला भेट दिली. जिथे ते पाहणीसाठी सरकारी कन्या माध्यमिक विद्यालय हजिरा येथे पोहोचले. Wow Minister! The student complained; Chucky cleans the toilet done by the minister; Praise to Pradyumna Singh Tomar
तपासणीदरम्यान हजिरा येथील शासकीय कन्या माध्यमिक विद्यालयात स्वच्छतागृह अस्वच्छ आढळून आले. त्यानंतर त्यांनी स्वत: झाडू आणि ब्रश घेतला आणि स्वतःच्या हातांनी स्वच्छ केला. यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा शिक्षणाधिकारी यांना जिल्हाभरातील शाळांमधील स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता करण्याच्या सूचनाही दिल्या.
प्रद्युम्न सिंग तोमर हे आपल्या एका दौऱ्यानिमित्त ग्वाल्हेरला आले होते. यावेळी त्यांनी ग्वाल्हेरलाच्या हजीरा परिसरातील शासकीय कन्या माध्यमिक विद्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील विद्यार्थीनींशी संवाद साधला. यापैकीच एका विद्यार्थीनीने शाळेचे शौचालय अस्वच्छ असल्याची तक्रार मंत्र्यांकडे केली होती.
या तक्रारीनंतर तोमर यांनी स्वत: हातात झाडू घेऊन हे शौचालय साफ केले. तसेच राज्यातील सर्व शाळेतील शौचालयाची नियमीत स्वच्छता राखली जावी याबाबत देखील त्यांनी आदेश दिले आहेत. ऊर्जा मंत्र्यांच्या या कृतीचे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
दरम्यान ऊर्ज मंत्री प्रद्युम्न सिंग तोमर यांची स्वच्छता करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. तर त्यांनी यापूर्वी देखील अनेकवेळा स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करताना ते अनेकदा आढळून आले आहेत. तसेच ते वेळोवेळी आपल्या कृतीमधून स्वच्छतेचा संदेश देत असतात.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App